Central Bank Of India Recruitment 2026
बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) ने विविध विभागांमध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर (Specialist Officer) च्या पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. जर तुमच्याकडे तांत्रिक शिक्षण आणि कामाचा अनुभव असेल, तर ही तुमच्यासाठी एक उत्कृष्ट संधी आहे.
ठळक मुद्दे आणि महत्त्वाच्या तारखे (Important Dates) Central Bank Of India Recruitment 2026
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन असून ती मर्यादित काळासाठी खुली आहे:
* अर्ज भरण्यास सुरुवात: २८ फेब्रुवारी २०२६
* अर्ज करण्याची अंतिम तारीख: २३ मार्च २०२६
* ऑनलाइन परीक्षेचा महिना: एप्रिल २०२६ (संभाव्य)
* मुलाखतीचा काळ: एप्रिल २०२६ (संभाव्य)
एकूण रिक्त पदे आणि विभाग (Vacancies) Central Bank Of India Recruitment 2026
या भरतीद्वारे एकूण २७५ पदे भरली जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने खालील विभागांचा समावेश आहे:
* IT विभाग: सॉफ्टवेअर डेव्हलपर (Java, .Net), डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेशन, क्लाउड मॅनेजर, इन्फॉर्मेशन सिक्युरिटी, नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर.
* डेटा सायन्स: डेटा सायंटिस्ट, डेटा आर्किटेक्ट, AI आणि Gen AI तज्ञ.
* इतर पदे: रिस्क मॅनेजर, टॅक्सेशन/CA आणि आयटी ऑफिसर.
पात्रता आणि वयोमर्यादा (Eligibility & Age Limit) Central Bank Of India Recruitment 2026
* शैक्षणिक पात्रता: उमेदवाराकडे संबंधित विषयात B.E. / B.Tech / MCA किंवा CA/MBA पदवी असणे आवश्यक आहे.
* अनुभव: बहुतेक पदांसाठी किमान २ ते १० वर्षांचा अनुभव आवश्यक आहे, मात्र ‘रिस्क मॅनेजर (Scale I)’ पदासाठी कोणत्याही अनुभवाची गरज नाही.
* वयोमर्यादा (३१.०१.२०२६ रोजी):
* Scale I: कमाल ३० वर्षे
* Scale II आणि III: कमाल ३५ वर्षे
* Scale IV: कमाल ४५ वर्षे
(टीप: SC/ST साठी ५ वर्षे आणि OBC साठी ३ वर्षे वयात सवलत मिळेल.)
नोकरीचे स्वरूप आणि पगार (Job Role & Salary) Central Bank Of India Recruitment 2026
निवड झालेल्या उमेदवारांना प्रामुख्याने बँकेच्या तांत्रिक प्रणाली सांभाळणे, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, सायबर सुरक्षा सुनिश्चित करणे आणि बँकिंग ऑपरेशन्समध्ये तांत्रिक मदत करणे ही कामे करावी लागतील.
पगार (Scale of Pay):
बँकेचे वेतनमान अत्यंत आकर्षक असून सुरुवातीचा मूळ पगार खालीलप्रमाणे आहे:
* Scale I (Assistant Manager): ₹४८,४८० – ₹८५,९२०
* Scale II (Manager): ₹६४,८२० – ₹९३,९६०
* Scale III (Senior Manager): ₹८५,९२० – ₹१,०५,२८०
* Scale IV (Chief Manager): ₹१,०२,३०० – ₹१,२०,९४०
(याशिवाय महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि इतर भत्ते बँकेच्या नियमानुसार दिले जातात.)
निवड प्रक्रिया (Selection Process) Central Bank Of India Recruitment 2026
१. ऑनलाइन परीक्षा: यामध्ये तांत्रिक विषयावर ७५ गुणांचे ५० प्रश्न, रिझनिंग (१५ प्रश्न) आणि बँकिंग/सामान्य ज्ञान (१० प्रश्न) विचारले जातील.
२. मुलाखत: परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांना १०० गुणांच्या मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
३. गुणवत्ता यादी: अंतिम निवड लेखी परीक्षा आणि मुलाखत यांच्या ७०:३० या प्रमाणानुसार केली जाईल.
अर्ज शुल्क (Application Fee) Central Bank Of India Recruitment 2026
* SC / ST / PwBD / महिला उमेदवार: ₹१७५
* इतर सर्व उमेदवार: ₹८५०
महत्त्वाच्या लिंक्स:
* अधिकृत वेबसाइट: www.centralbankofindia.co.in
* ऑनलाइन अर्जाची लिंक: https://ibpsreg.ibps.in/cbisofeb26/
माहिती वाचा : पीडीएफ
बार्टीकडून अ. जा. उमेदवारांना ५०,००० ₹ आर्थिक सहाय्य