MAHA TET 2026 Online : परीक्षा आता ऑनलाईन होणार! IBPS घेणार परीक्षा; महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अधिकृत पत्र जारी

MAHA TET 2026 Online : परीक्षा आता ऑनलाईन होणार! IBPS घेणार परीक्षा; महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अधिकृत पत्र जारी

    MAHA TET 2026 Online : परीक्षा आता ऑनलाईन होणार! IBPS घेणार परीक्षा; महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अधिकृत पत्र जारी

    महाराष्ट्र राज्यातील शिक्षक बनू इच्छिणाऱ्या सर्व डी.टी.एड. (D.T.Ed.) आणि बी.एड. (B.Ed.) धारक उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच MAHA TET 2026 परीक्षा आता पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने आयोजित केली जाणार आहे. विशेष म्हणजे ही परीक्षा नामांकित आणि अत्यंत विश्वसनीय अशी संस्था IBPS (Institute of Banking Personnel Selection) मार्फत घेतली जाणार आहे.
    महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने आयुक्त महेश चोधे यांनी या संदर्भात मा. व्यवस्थापक, IBPS, गोपनीय संस्था, मुंबई यांना अधिकृत पत्र पाठवले आहे. या पत्रानुसार, परीक्षेच्या आयोजनामध्ये संपूर्ण पारदर्शकता आणि सुरक्षा राखण्यासाठी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याची विनंती करण्यात आली आहे.

    MAHA TET 2026 परीक्षा पुढे का ढकलण्यात आली?

    यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत प्रसिद्धी निवेदनानुसार (संदर्भ क्र. 1), ही परीक्षा दिनांक 28 June 2026 रोजी आयोजित करण्यात आली होती. परंतु, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जाहीर प्रकटनाद्वारे (संदर्भ क्र. 2) दिनांक 28 June 2026 रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आता ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यासाठी नवीन नियोजन केले जात आहे.  MAHA TET 2026 Online

    महत्त्वाची आकडेवारी: MAHA TET 2026 साठी आलेले एकूण अर्ज

    या परीक्षेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. अधिकृत पत्रामध्ये दिलेल्या माहितीनुसार एकूण परीक्षार्थी आणि निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रांची संख्या खालीलप्रमाणे आहे: परीक्षा पेपर एकूण अर्जदार विद्यार्थी संख्या निश्चित केलेली परीक्षा केंद्रे पेपर क्र. 1 (Paper 1) 258061 701 पेपर क्र. 2 (Paper 2) 342064 1028 एकूण (Total)6001251729 परीक्षा केंद्रांवर सकाळ व दुपार अशा दोन सत्रांमध्ये या परीक्षेचे ऑनलाईन आयोजन केले जाणार आहे.

    सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय आणि मुदतवाढ

    दिनांक 1 September 2025 रोजी मा. सर्वोच्च न्यायालयाने याचिका क्र. 1385/2025 तसेच इतर संबंधित याचिकांवर दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने एक महत्त्वाचा निकाल दिला आहे. या निर्णयानुसार, सेवेतील शिक्षकांना टीईटी (TET) परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आले आहे. तथापि, सेवेतील शिक्षक आणि सेवेत येणाऱ्या नवीन शिक्षकांना ही टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी सन 2028 पर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे.  MAHA TET 2026 Online

    आहाता वर्षातून दोनदा होणार परीक्षा!

    सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता, शासन निर्देशानुसार आता महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) वर्षातून किमान 2 वेळा घेण्याचे प्रस्तावित आहे. यापुढील सर्व परीक्षा या ऑनलाईन कार्यपद्धतीचा अवलंब करूनच घेतल्या जातील, असेही परीक्षा परिषदेच्या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.  MAHA TET 2026 Online

    आयोजनाची जबाबदारी IBPS कडे का?

    महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने पत्रात नमूद केल्यानुसार, शासन निर्णयानुसार ही परीक्षा अत्यंत सुरक्षितरीत्या आणि पारदर्शकपणे पार पडणे गरजेचे आहे. IBPS ही संस्था बँकिंग आणि इतर राष्ट्रीय पातळीवरील मोठ्या परीक्षा अत्यंत सुरक्षित, पेपर लीक मुक्त आणि अचूक पद्धतीने ऑनलाईन घेण्याबाबत ओळखली जाते. त्यामुळे या परीक्षेचे संपूर्ण नियोजन व आयोजन लवकरात लवकर आणि सुरक्षितरीत्या करण्यासाठी IBPS ची मदत घेतली जात आहे.

    अधिकृत पत्रासोबत जोडलेली मुख्य कागदपत्रे:

    परीक्षा परिषदेने या पत्रासोबत खालील महत्त्वाची माहिती व दस्तऐवज IBPS ला पुढील ऑनलाईन नियोजनासाठी सादर केले आहेत:

    1. माध्यम निहाय व पेपर निहाय प्रविष्ट परीक्षार्थींची संख्या.
    2. जिल्हा निहाय परीक्षार्थी व निश्चित केलेल्या केंद्रांची संख्या.
    3. जिल्हा निहाय सेवेत कार्यरत परीक्षार्थी शिक्षकांची संख्या.
    4. जिल्हा निहाय दिव्यांग उमेदवार (परीक्षार्थींची) संख्या (लेखनिकासह व लेखानिकाशिवाय).
    5. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) बाबतचे शासन निर्णय.  MAHA TET 2026 Online

    विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला

    जी परीक्षा आधी ऑफलाईन किंवा जुन्या पद्धतीने होणार होती, ती आता आयबीपीएस (IBPS Pattern) नुसार ऑनलाईन संगणकावर होणार असल्याने विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाची पद्धत बदलणे गरजेचे आहे. प्रश्न विचारण्याची पद्धत काठिण्यपातळी आणि टाईम मॅनेजमेंट या गोष्टी आता बदलणार आहेत, त्यामुळे उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षेचा आणि मॉक टेस्टचा (Mock Tests) सराव करणे फायदेशीर ठरेल.
    अशाच नवनवीन शैक्षणिक आणि नोकरीविषयक अपडेट्ससाठी आमच्या वेबसाईटला नियमित भेट देत राहा!  MAHA TET 2026 Online

    MH Assistant Professor Recruitment 

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    Related Post