Mahabeej Akola Vacancy 2026 : महाबीज अकोला भरती 2026: महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात 353 पेषा अधिक रिक्त पदे; जाणून घ्या संपूर्ण गटनिहाय व पदनिहाय सविस्तर तपशील!

Mahabeej Akola Vacancy 2026 : महाबीज अकोला भरती 2026: महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात 353 पेषा अधिक रिक्त पदे; जाणून घ्या संपूर्ण गटनिहाय व पदनिहाय सविस्तर तपशील!

Mahabeej Akola Vacancy 2026 : महाबीज अकोला भरती 2026: महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात 353 रिक्त पदांचा तपशील जाहीर, संपूर्ण माहिती येथे पहा!

महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित, अकोला (महाबीज) कडून दिनांक 01-05-2026 रोजीपर्यंतची सर्व संवर्गातील भरण्यात आलेली पदे, कार्यरत कर्मचारी आणि रिक्त पदे यांची एकत्रित अधिकृत आकडेवारी (गोशवारा) जाहीर करण्यात आली आहे.
जर तुम्ही सरकारी नोकरी किंवा कृषी क्षेत्रातील विविध पदांसाठी तयारी करत असाल, तर आगामी काळात महाबीजमध्ये येणाऱ्या संभाव्य मेगाभरतीच्या दृष्टीने ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या लेखात आपण एकूण रिक्त पदे, कोणत्या गटात किती जागा शिल्लक आहेत आणि कोणत्या पदाला किती पगार (वेतनश्रेणी) मिळतो, याची संपूर्ण माहिती सोप्या भाषेत समजून घेणार आहोत.  Mahabeej Akola Vacancy 2026

महाबीज भरती 2026: महत्त्वाचा संक्षिप्त गोशवारा (Overview)

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या आकृतीबंधानुसार एकूण मंजूर पदे, कार्यरत पदे आणि रिक्त पदांचा संक्षिप्त आढावा खालीलप्रमाणे आहे:

  • एकूण मंजूर पदे (Sanctioned Posts): 681
  • एकूण कार्यरत पदे (Filled Posts): 328
  • एकूण रिक्त पदे (Vacant Posts): 353
  • अधिसंख्य पदावर कार्यरत कर्मचारी (Supernumerary Staff): 5
  • एकूण प्रत्यक्ष कार्यरत पदे (नियमित + अधिसंख्य): 333  Mahabeej Akola Vacancy 2026

गटनिहाय (Group-Wise) रिक्त पदांची स्थिती

महामंडळातील पदांचे वर्गीकरण गट अ, ब, क आणि ड (Group A, B, C & D) मध्ये करण्यात आले आहे. त्याची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे: अ. क्र. संवर्ग / गट एकूण मंजूर पदे कार्यरत पदे रिक्त पदे अधिसंख्य पदे एकूण कार्यरत पदे

1 गट अ (Group A) 60 39 21 0 39

2 गट ब (Group B) 242 119 123 0 119

3 गट क (Group C) 167 78 89 1 79

4 गट ड (Group D) 212 92 120 4 96

एकूण (Total)6813283535333

सविस्तर पदनिहाय आणि वेतनश्रेणी तपशील (Post-wise & Pay Matrix Details)

शासन निर्णय दिनांक 30/10/2014 च्या आकृतीबंधानुसार मंजूर, कार्यरत आणि रिक्त पदांचा संपूर्ण तपशील खालीलप्रमाणे आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी वेतनश्रेणी सुद्धा सोबत दिली आहे:  Mahabeej Akola Vacancy 2026

1. गट अ (Group A) मधील पदे:

या गटामध्ये उच्च प्रशासकीय आणि व्यवस्थापकीय पदांचा समावेश होतो. अ.क्र. पदाचे नाव मंजूर पदे कार्यरत पदे रिक्त पदे वेतनश्रेणी लेव्हल सुधारित वेतन मॅट्रिक्स (पगार) 1 व्यवस्थापकीय संचालक (भा.प्र.से.) 1 1 0 – शासनाद्वारे प्रतिनियुक्ती करण्यात येते.

2 महाव्यवस्थापक (उत्पादन) 1 1 0 एस-27 123100-215900

3 महाव्यवस्थापक (प्रक्रिया) 1 1 0 एस-27 123100-215900

4 महाव्यवस्थापक (गु.नि. व संशोधन) 1 1 0 एस-27 123100-215900 5 महाव्यवस्थापक (विपणन) 1 1 0 एस-27 123100-215900

6 महाव्यवस्थापक (वित्त) 1 1 0 एस-27 123100-215900 7 महाव्यवस्थापक (प्रशासन) 1 1 0 – शासनाद्वारे प्रतिनियुक्ती करण्यात येते.

8 उपमहाव्यवस्थापक (उत्पादन) 1 1 0 एस-24 79900-211100 9 उपमहाव्यवस्थापक (विपणन) 1 1 0 एस-24 79900-211100

10 उपमहाव्यवस्थापक (प्रक्रिया) 1 0 1 एस-24 79900-211100

11 उपमहाव्यवस्थापक (वित्त) 1 0 1 एस-24 79900-211100

12 कंपनी सचिव तथा उपमहाव्यवस्थापक 1 1 0 एस-24 79900-211100

13 विभागीय व्यवस्थापक 8 6 2 एस-23 67700-208700

14 विभागीय व्यवस्थापक (गु.नि.) 1 0 1 एस-23 67700-208700

15 जिल्हा व्यवस्थापक श्रेणी-1 16 10 6 एस-20 56100-177500

16 जिल्हा व्यवस्थापक (ऊती संवर्धन) 1 0 1 एस-20 56100-177500

17 वरिष्ठ पैदासकार 2 1 1 एस-20 56100-177500

18 वरिष्ठ कृषि अभियंता 4 3 1 एस-20 56100-177500

19 संगणक व्यवस्थापक 1 1 0 एस-20 56100-177500

20 बीज परीक्षण अधिकारी 1 1 0 एस-20 56100-177500

21 सहायक लेखाधिकारी 4 4 0 एस-20 56100-177500

22 कामगार कल्याण अधिकारी 1 0 1 एस-16 44900-142400

23 केंद्र अभियंता/ व्यवस्थापक (प्रक्रिया सामुग्री) 9 3 6 एस-16 44900-142400

2. गट ब (Group B) मधील पदे:

या गटामध्ये प्रामुख्याने तांत्रिक, क्षेत्रीय आणि कनिष्ठ अभियांत्रिकी पदांचा समावेश होतो. येथे कृषि क्षेत्र अधिकारी या पदासाठी सर्वाधिक 96 जागा रिक्त आहेत. अ.क्र. पदाचे नाव मंजूर पदे कार्यरत पदे रिक्त पदे वेतनश्रेणी लेव्हल सुधारित वेतन मॅट्रिक्स (पगार) 24 जिल्हा व्यवस्थापक श्रेणी-2/क्षेत्र अधिकारी 27 18 9 एस-15 41800-132300 25 मा.व्य.सं. यांचे स्वीय सहायक 1 0 1 एस-15 41800-132300 26 कनिष्ठ अभियंता 4 1 3 एस-15 41800-132300 27 कनिष्ठ केंद्र अभियंता 6 5 1 एस-15 41800-132300 28 लेखापाल/अंतर्गत अंकेक्षक 21 18 3 एस-15 41800-132300 29 सहायक व्यवस्थापक (कर्म. व प्रशा.) 1 0 1 एस-14 38600-122800 30 सुरक्षा अधिकारी 3 0 3 एस-14 38600-122800 31 कृषि क्षेत्र अधिकारी (सहायक क्षेत्र अधिकारी) 171 75 96 एस-14 38600-122800 32 कनिष्ठ पैदासकार 3 2 1 एस-14 38600-122800 33 लघुलेखक (निम्न श्रेणी) 4 0 4 एस-14 38600-122800 34 लघुलेखक (उच्च श्रेणी) 1 0 1 एस-14 38600-122800

3. गट क (Group C) मधील पदे:

या गटामध्ये लिपिक, तंत्रज्ञ, सहाय्यक आणि वाहनचालक यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या लिपिकीय व तांत्रिक पदांचा समावेश होतो. लिपीक-टंकलेखक पदासाठी 47 जागा आणि वाहनचालक पदासाठी 17 जागा रिक्त आहेत. अ.क्र. पदाचे नाव मंजूर पदे कार्यरत पदे रिक्त पदे वेतनश्रेणी लेव्हल सुधारित वेतन मॅट्रिक्स (पगार) 35 सहायक/भांडारपाल 24 15 9 एस-13 35400-112400 36 आरेखक 1 0 1 एस-13 35400-112400 37 प्रभारी वाहने (व्हीईकल इन्चार्ज) 1 0 1 एस-13 35400-112400 38 लिपीक-टंकलेखक 90 43 47 एस-8 25500-81100 39 प्रयोगशाळा सहायक 7 2 5 एस-8 25500-81100 40 वरिष्ठ यंत्रचालक 3 2 1 एस-8 25500-81100 41 माळी 1 1 0 एस-8 25500-81100 42 कनिष्ठ लिपीक-टंकलेखक 23 15 8 एस-6 19900-63200 43 वाहनचालक 17 0 17 एस-6 19900-63200

4. गट ड (Group D) मधील पदे:

हा चतुर्थ श्रेणी कर्मचारी संवर्ग आहे, ज्यामध्ये प्रक्रियेसाठी लागणारे सहायक आणि शिपाई पदांचा समावेश होतो. यामध्ये कनिष्ठ प्रक्रिया सहायक (42 पदे) आणि शिपाई-पहारेकरी (48 पदे) मोठ्या संख्येने रिक्त आहेत. अ.क्र. पदाचे नाव मंजूर पदे कार्यरत पदे रिक्त पदे वेतनश्रेणी लेव्हल सुधारित वेतन मॅट्रिक्स (पगार) 44 कनिष्ठ प्रक्रिया सहायक 92 50 42 एस-3 16600-52400 45 कनिष्ठ यंत्रचालक 45 18 27 एस-3 16600-52400 46 मदतनीस 2 0 2 एस-3 16600-52400 47 शिपाई-पहारेकरी 72 24 48 एस-1 15000-47600 48 सहायक माळी 1 0 1 एस-1 15000-47600  

अधिसंख्य पदांवर कार्यरत कर्मचारी (Supernumerary Employees)

महामंडळात काही कर्मचारी नियमित मंजूर पदांव्यतिरिक्त ‘अधिसंख्य पदांवर’ कार्यरत आहेत, ज्यांची संख्या 5 आहे:

  1. लिपीक-टंकलेखक (गट क): 1 कर्मचारी कार्यरत (वेतनश्रेणी: 25500-81100)
  2. कनिष्ठ प्रक्रिया सहायक (गट ड): 2 कर्मचारी कार्यरत (वेतनश्रेणी: 16600-52400)
  3. कनिष्ठ यंत्रचालक (गट ड): 1 कर्मचारी कार्यरत (वेतनश्रेणी: 16600-52400)
  4. शिपाई-पहारेकरी (गट ड): 1 कर्मचारी कार्यरत (वेतनश्रेणी: 15000-47600) Mahabeej Akola Vacancy 2026

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सुचना व निष्कर्ष

महाबीज अकोला अंतर्गत सध्या 353 जागा रिकाम्या आहेत. कृषी पदवीधर, अभियंता, पदवीधर (Graduates) आणि ITI किंवा 10 वी / 12 वी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या सर्व पदांवर भविष्यात मोठी संधी उपलब्ध होऊ शकते. महामंडळाकडून अधिकृत भरती प्रक्रिया केव्हाही सुरू केली जाऊ शकते, त्यामुळे पात्र उमेदवारांनी आपल्या अभ्यासाला गती देणे आवश्यक आहे.  Mahabeej Akola Vacancy 2026
भरती संदर्भातील पुढील अपडेट्स आणि सविस्तर जाहिरात प्रसिद्ध होताच ती आपल्या वेबसाईटवर सर्वात आधी उपलब्ध करून दिली जाईल. रेग्युलर अपडेट्ससाठी आमच्या वेबसाईटला भेट देत राहा!  Mahabeej Akola Vacancy 2026

Adivasi Vikas Vibhag Bharti 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post