Nagar Parishad Bharti Syllabus & Exam Pattern 2026 : नगरपरिषद व नगरपंचायत भरती: गट ‘क’ आणि गट ‘ड’ सुधारित अभ्यासक्रम व परीक्षा स्वरूप जाहीर | संपूर्ण माहिती
महाराष्ट्र शासनाच्या नगरपरिषद प्रशासन संचालनालयामार्फत (DMA) राज्यातील सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमधील गट ‘क’ (वर्ग-3) आणि गट ‘ड’ (वर्ग-4) संवर्गातील स्थायी रिक्त पदांच्या भरतीसंदर्भात अत्यंत महत्त्वाचे परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे.
या भरती प्रक्रियेमध्ये पारदर्शकता व एकसूत्रता राखण्यासाठी परीक्षा पद्धती, गुणांकन आणि सविस्तर अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला आहे. विशेषतः रोखपाल, आरोग्य सहायक, परिचारिका, वैद्यकीय अधिकारी, अनुरेखक, आरेखक या पदांचा अभ्यासक्रम आणि जोडारी/वीजतंत्री, सहायक ग्रंथपाल या पदांचे सुधारित परीक्षा स्वरूप या परिपत्रकाद्वारे अधिकृतरीत्या स्पष्ट करण्यात आले आहे. Nagar Parishad Bharti Syllabus & Exam Pattern 2026
विद्यार्थी व उमेदवारांच्या सोयीसाठी संपूर्ण माहिती, परीक्षा पद्धती, विषयनिहाय गुण आणि पदनिहाय तांत्रिक अभ्यासक्रम खालीलप्रमाणे सविस्तर दिला आहे.
१. परीक्षा स्वरूप: ठळक बाबी (Exam Highlights)
- परीक्षेचा प्रकार: वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (MCQ Pattern)
- एकूण प्रश्न: 100 प्रश्न
- एकूण गुण: 200 गुण (प्रत्येक प्रश्नाला 2 गुण)
- कालावधी: 2 तास (120 मिनिटे)
- परीक्षा पद्धती:
- अतांत्रिक पदे (Non-Technical): मराठी (25 प्रश्न), इंग्रजी (25 प्रश्न), सामान्य ज्ञान (25 प्रश्न), बौद्धिक चाचणी (25 प्रश्न) = एकूण 100 प्रश्न / 200 गुण.
- तांत्रिक पदे (Technical Posts): मराठी (15 प्रश्न), इंग्रजी (15 प्रश्न), सामान्य ज्ञान (15 प्रश्न), बौद्धिक चाचणी (15 प्रश्न) आणि पदसंबंधित तांत्रिक विषय (40 प्रश्न) = एकूण 100 प्रश्न / 200 गुण.
- वैद्यकीय अधिकारी (Medical Officer): तांत्रिक विषयाशी संबंधित 100 प्रश्न / 200 गुण. Nagar Parishad Bharti Syllabus & Exam Pattern 2026
२. परिशिष्ट-अ: अतांत्रिक संवर्गातील पदांचे परीक्षा स्वरूप
खालील पदांसाठी कोणताही तांत्रिक विषय नसून केवळ सामान्य विषय विचारले जातील:
- संवर्ग/पदे: १) वरिष्ठ लिपिक, २) लिपिक टंकलेखक, ३) लघुटंकलेखक, ४) वाहनचालक, ५) रोखपाल, ६) वाहनचालक कम ऑपरेटर, ७) शिपाई.
अ.क्र.विषयप्रश्न संख्यागुणमाध्यमकालावधीप्रश्नपत्रिकेचे स्वरूप 1मराठी2550मराठी2 तासवस्तुनिष्ठ बहुपर्यायी 2इंग्रजी2550इंग्रजी2 तासवस्तुनिष्ठ बहुपर्यायी 3सामान्य ज्ञान2550मराठी2 तासवस्तुनिष्ठ बहुपर्यायी 4बौद्धिक चाचणी2550मराठी2 तासवस्तुनिष्ठ बहुपर्यायी एकूण1002002 तास
(दर्जा: उमेदवारांच्या शैक्षणिक अर्हतेच्या समकक्षाच्या दर्जासमान राहील.) Nagar Parishad Bharti Syllabus & Exam Pattern 2026
३. परिशिष्ट-ब: तांत्रिक संवर्गातील पदांचे सुधारित परीक्षा स्वरूप
खालील तांत्रिक पदांसाठी सामान्य विषयांसोबत 40 प्रश्न (80 गुण) तांत्रिक घटकांवर विचारले जातील:
- संवर्ग/पदे: उद्यान पर्यवेक्षक, सहायक ग्रंथपाल, गाळणी चालक / प्रयोगशाळा सहायक, जोडारी / वीजतंत्री, पंप ऑपरेटर, तारतंत्री (वायरमन), अनुरेखक, आरेखक, आरोग्य सहायक, परिचारिका, व्हॉलमन, अग्निशामक विमोचक (फायरमन).
अ.क्र.विषयप्रश्न संख्यासुधारित गुणमाध्यमकालावधीस्वरूप 1मराठी1530मराठी2 तासवस्तुनिष्ठ बहुपर्यायी 2इंग्रजी1530इंग्रजी2 तासवस्तुनिष्ठ बहुपर्यायी 3सामान्य ज्ञान1530मराठी2 तासवस्तुनिष्ठ बहुपर्यायी 4बौद्धिक चाचणी1530मराठी2 तासवस्तुनिष्ठ बहुपर्यायी 5तांत्रिक विषयाशी संबंधित4080मराठी / इंग्रजी2 तासवस्तुनिष्ठ बहुपर्यायी एकूण1002002 तास
महत्त्वाची सुधारणा: पूर्वी या तांत्रिक पदांसाठी सामान्य 4 विषयांना प्रत्येकी 50 गुण आणि तांत्रिक विषयाला 80 गुण असे एकूण 280 गुणांचे नियोजन दर्शवले गेले होते. सुधारित नियमानुसार आता सामान्य 4 विषयांचे प्रत्येकी 15 प्रश्न (30 गुण) आणि तांत्रिक घटकाचे 40 प्रश्न (80 गुण) मिळून एकूण 100 प्रश्न व 200 गुण अशी रचना निश्चित करण्यात आली आहे.
४. सर्वसाधारण विषयांचा अभ्यासक्रम (Core Syllabus)
अ) मराठी व्याकरण व भाषा (मराठी)
- सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण
- म्हणी व वाक्प्रचार – अर्थ आणि वाक्यात उपयोग
- उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे
- वाक्यपृथक्करण व त्याचे प्रकार
- लेखक व कवींची टोपणनावे Nagar Parishad Bharti Syllabus & Exam Pattern 2026
- समूहदर्शक शब्द, ध्वनिदर्शक शब्द, प्राणी व त्यांची घरे इत्यादी
ब) इंग्रजी भाषा (English)
- Common Vocabulary
- Sentence Structure & Sentence Arrangement
- Grammar
- Idioms and Phrases and their meanings
- Comprehension of Passage
- Error Correction Nagar Parishad Bharti Syllabus & Exam Pattern 2026
क) सामान्य ज्ञान (General Knowledge)
- इतिहास: आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास.
- भूगोल: महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह – पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी.
- अर्थशास्त्र / अर्थव्यवस्था: राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती, अर्थसंकल्प, लेखा व लेखापरीक्षण इत्यादी.
- चालू घडामोडी: जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील ताज्या घडामोडी.
- राज्यशास्त्र / भारताची राज्यघटना: भारतीय राज्यघटना व प्रशासन प्रणाली.
- सामान्य विज्ञान: भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry), प्राणिशास्त्र (Zoology), वनस्पतीशास्त्र (Botany) आणि आरोग्यशास्त्र (Hygiene).
ड) बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित (Aptitude & Reasoning)
- बुद्धिमापन चाचणी: क्रमबद्ध मालिका, संख्या संचातील अंक शोधणे, समान संबंध (Analogy), आकृत्यांमधील अंक शोधणे, वेन आकृती, कालमापन (दिनदर्शिका/कॅलेंडर), रांगेवरील प्रश्न, सांकेतिक लिपी/भाषा (Coding-Decoding), विसंगत पद ओळखणे, विधाने व अनुमाने, आरशातील व पाण्यातील प्रतिमा, दिशा व अंतर, घड्याळ, नातेसंबंध, निरीक्षण व आकलन क्षमता.
- अंकगणित: बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक, टक्केवारी इत्यादी मूलभूत गणिती क्रिया. Nagar Parishad Bharti Syllabus & Exam Pattern 2026
५. पदनिहाय सविस्तर तांत्रिक अभ्यासक्रम (Post-Wise Technical Syllabus)
१. रोखपाल (Cashier)
- परीक्षा रचना: मराठी (25), इंग्रजी (25), सामान्य ज्ञान (25), बौद्धिक चाचणी (25) = एकूण 100 प्रश्न (200 गुण).
- अभ्यासक्रम: वर नमूद केलेला सर्वसाधारण अभ्यासक्रम (मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, गणित व बुद्धिमत्ता).
२. आरोग्य सहायक (Health Assistant)
- परीक्षा रचना: मराठी (15), इंग्रजी (15), सामान्य ज्ञान (15), बौद्धिक चाचणी (15) + तांत्रिक अभ्यासक्रम (40 प्रश्न).
- तांत्रिक अभ्यासक्रम:
- वैज्ञानिक विषय: Biophysics and Radiation Science, Nuclear Physics, Laws of Motion, Conservation Laws, Gravitation, Electrostatics, Ultrasonic and Acoustics, Thermodynamics, Biochemical Analysis, Separation Technics, Metabolism, Body Fluids, Liver/Kidney/Gastric/Thyroid Function, Organic Chemistry, Material Science, Biochemistry, Nanotechnology, Molecular Biology, Cell Biology, Immunology, Biotechnology, Pathology, Anatomy, Physiology, Microbiology (Virology, Mycology, Serology).
- सार्वजनिक आरोग्य व सेवा: माहिती शिक्षण आणि संदेशवहन (IEC), घरगुती सेवा व प्राथमिक वैद्यकीय उपचार, आरोग्य विषयक माहिती व जीवन विषयक आकडेवारी, समाजासाठी आरोग्य सेवा, राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), माहिती तंत्रज्ञान, आयुष (AYUSH), विविध जागतिक व राष्ट्रीय आरोग्य दिन, पर्यावरण आणि आरोग्य, लैंगिक आजार (STDs), संसर्गजन्य आजार, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, कीटकजन्य आजार, लसीकरणाद्वारे टाळता येणारे आजार, हवेद्वारे व पाण्याद्वारे पसरणारे आजार, सूक्ष्मजीवशास्त्र व वैयक्तिक स्वच्छता, आहार व पोषणशास्त्र, माता प्रजनन व बाल आरोग्य. Nagar Parishad Bharti Syllabus & Exam Pattern 2026
३. परिचारिका (Nurse)
- परीक्षा रचना: मराठी (15), इंग्रजी (15), सामान्य ज्ञान (15), बौद्धिक चाचणी (15) + तांत्रिक अभ्यासक्रम (40 प्रश्न).
- तांत्रिक अभ्यासक्रम:
- Applied Microbiology and Pathology
- Pollution: Introduction, Causes, Effects and Control Measures; Nutrition and Nutritional Assessment, Nutrition Education and Food Safety
- Information, Education and Communication (IEC)
- Behavior Change Communication (BCC)
- Individual and Family Education
- Counselling
- Organization of Health Care Services
- Epidemiology
- Vital Statistics
- Communicable and Non-Communicable Diseases under National Health Programs
- Common Conditions and Emergencies
- First Aid in Emergency Conditions
- Reproductive Child Health (RCH) and Family Planning
- Sexually Transmitted Infections (STIs)
- Child Health & Adolescent Health
- Specialized Role of Community Health Nurses
- Community Mental Health and Counselling
- Disaster Management
- Standards of Practice & Problem Solving Approach
- Health Center Management, Leadership and Supervision
- Biomedical Waste Management (BMWM)
४. वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)
- परीक्षा रचना: संपूर्ण 100 प्रश्न केवळ तांत्रिक विषयाशी संबंधित असतील (एकूण 200 गुण).
- तांत्रिक अभ्यासक्रम:
- Pharmacology
- Forensic Medicine & Toxicology: Special emphasis on post-mortem findings, injury reports, age determination, and examination of rape victims.
- General Medicine and Allied Subjects: Special emphasis on medical emergencies.
- Pediatrics: Emergencies in pediatrics and comprehensive immunization.
- General Surgery: Special emphasis on surgical emergencies.
- Orthopedics: Primary treatment and care of fractures.
- Otorhinolaryngology (ENT): Emergencies in ENT.
- Ophthalmology: Emergencies in Ophthalmology.
- Obstetrics and Gynecology: Normal labor, Postpartum Hemorrhage (PPH), and OB-GYN emergencies.
- Microbiology: Sterilization and disinfection of OT, instruments, and equipment; Biomedical Waste Management; functioning of Central Clinical Laboratory.
- Health Acts & Schemes: Acts related to medical sciences, National & State health schemes, and government health programs.
५. आरेखक (Draftsman) / अनुरेखक (Tracer)
- परीक्षा रचना: मराठी (25), इंग्रजी (25), सामान्य ज्ञान (25), बौद्धिक चाचणी (25) = एकूण 100 प्रश्न (200 गुण).
- विशेष घटक (सामान्य ज्ञान व तांत्रिक संगणक ज्ञान अंतर्गत समाविष्ट):
- मूलभूत संगणक ज्ञान, माहिती तंत्रज्ञान (Data Communication, Networking, Web Technology).
- तांत्रिक संज्ञा व रेखांकन: रंगसंगती, प्रमाण (Scale), नकाशा वाचन, सांकेतिक खुणा, प्रक्षेपणाचे प्रकार, सर्वेक्षणाचे प्रकार, रेखांकन, संरेखन, मोजमापाची परिमाणे व त्यांचे रूपांतरण, समोच्च रेषा व नकाशा (Contour Line and Map).
- AutoCAD: संगणक सहाय्यित स्वयंचलित संरचना (AutoCAD) मधील मूलभूत संकल्पना व टूल्स.
- GIS आणि GPS: GIS Data Model and Structures, Georeferencing and Coordinate Systems, Spatial Analysis, GPS Data Collection and its Processing.
६. तारतंत्री (वायरमन) / जोडारी (फिटर) / वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)
- परीक्षा रचना: मराठी (15), इंग्रजी (15), सामान्य ज्ञान (15), बौद्धिक चाचणी (15) + तांत्रिक अभ्यासक्रम (40 प्रश्न).
- तांत्रिक अभ्यासक्रम:
- राज्याचे नवीन व नवीकरणीय ऊर्जा स्रोत (अपारंपरिक ऊर्जा स्रोत) वीजनिर्मितीच्या पारेषण संलग्न प्रकल्पांसाठी एकत्रित धोरण – 2015 मधील तरतुदी.
- विद्युत विषयक नियम, सिद्धांत, सामग्री, इलेक्ट्रोस्टॅटिक्स, कॅपॅसिटर प्रकार/कार्य/समुहीकरण आणि उपयोग, उपकरण माहिती, ऊर्जा मीटरची (Energy Meter) स्थापना व सीलिंगसंबंधी अभ्यास.
- विजेचे व्यवस्थापन, पारेषण (Transmission), वितरण (Distribution) व उत्पादन.
- सबस्टेशन उपकरणांसंबंधी माहिती, महत्त्व व उपयोग.
- डीसी मशीन (DC Machines), जनरेटरचे सिद्धांत व प्रकार, ट्रान्सफॉर्मर, एसी मोटर (AC Motor), स्टार्टर आणि अल्टरनेटर, ट्रान्सफॉर्मरचे कार्य, सिद्धांत व वर्गीकरण.
- मोटर स्टार्टर्सचे प्रकार, आवश्यकता व कार्य.
- विविध विद्युत उपकरणे व त्यांचे नियंत्रण.
- घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वायरिंग सिस्टीम (Domestic, Commercial & Industrial Wiring).
- तार जोडणीसंबंधी तारेचे प्रकार, कंडक्टरचे गुणधर्म, सिद्धांत, कार्य, नियंत्रण कक्ष (Control Room), दोष निवारण व उपयोग.
- संबंधित ITI अभ्यासक्रम. Nagar Parishad Bharti Syllabus & Exam Pattern 2026
७. गाळणी चालक / प्रयोगशाळा सहायक (Filter Operator / Lab Assistant)
- तांत्रिक बाबी (40 प्रश्न):
- जलशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिया: एरिएशन (Aeration), एरिएटरची रचना, कोॲग्युलेशन (Coagulation) व फ्लॉक्युलेशन (Flocculation).
- क्लोरिनेटर हाताळणी, देखभाल व दुरुस्ती, क्लोरीन वापर, डोस, फायदे, क्लोरीन सिलिंडर व कंटेनर्स हँडलिंग, क्लोरिनेशन रूम सुरक्षा व जबाबदारी.
- पाण्याचे नमुने घेणे व चाचणी, रसायन मिश्रण प्रमाण व पद्धती, जलशुद्धीकरणाची संपूर्ण प्रक्रिया.
- जलशुद्धीकरण केंद्रातील मशिनरीची देखभाल व निगा, प्रकार व उपयोग.
- पाणीपुरवठा केंद्रात उद्भवणाऱ्या अडचणी, उपाययोजना व स्थापत्य परिरक्षण (Civil Maintenance).
- वाळूचे थर बदलणे व पुनर्चना (Sand Replacement).
- रॅपिड सँड फिल्टरमधील सर्वसाधारण दोष, प्रेशर फिल्टर रचना व कार्यपद्धती.
- शीघ्र गती गाळणी देखभाल (Rapid Filtration Maintenance). Nagar Parishad Bharti Syllabus & Exam Pattern 2026
८. पंप ऑपरेटर / व्हॉलमन (Pump Operator / Valveman)
- तांत्रिक बाबी (40 प्रश्न):
- पंप ऑपरेटरची भूमिका, जबाबदाऱ्या, पाणीपुरवठा योजना, नियम, उपकरणे व निकष.
- पॅनेल बोर्ड (Panel Board), त्याचे घटक व रचना, पॉवर फॅक्टर सुधारणा (Power Factor Improvement).
- इलेक्ट्रिकल मोटरचे प्रकार, अंतर्गत रचना, मापन साधने.
- विविध प्रकारचे पंप आणि त्यांचे उपयोग, बोअरवेल, पाइपलाइनसाठी पाइप व त्यांचे जॉइंट्स/जोडणी.
- व्हॉल्व्हचे प्रकार (Sluice, Air, Non-return Valve इत्यादी), त्यांचे कार्य, देखभाल व पाणी वितरणातील नियंत्रण.
९. उद्यान पर्यवेक्षक (Garden Supervisor)
- तांत्रिक बाबी (40 प्रश्न – पदवी समकक्ष दर्जा):
- फलोत्पादनाची मूलभूत तत्त्वे, बागायती पिकांचे वनस्पतीशास्त्र, विश्लेषणात्मक रसायनशास्त्र तत्त्वे, प्राथमिक वनस्पती बायोकेमिस्ट्री आणि जैवतंत्रज्ञान.
- पर्यावरण विज्ञान, अन्न तंत्रज्ञानाची मूलभूत तत्त्वे.
- वनस्पती प्रसार (Plant Propagation), रोपवाटिका व्यवस्थापन (Nursery Management) व वनस्पती प्रजननाची तत्त्वे.
- बागायती पिकांची वाढ व विकास, मातीची सुपीकता आणि एकात्मिक पोषक व्यवस्थापन.
- फळांचे रोग, वृक्षारोपण, औषधी व सुगंधी वनस्पती पिके, वनस्पती पॅथॉलॉजीची मूलभूत तत्त्वे.
- कीटकशास्त्राची मूलभूत तत्त्वे व नेमाटोड किडींचे व्यवस्थापन.
- सूक्ष्म सिंचन व पाणी व्यवस्थापन, फार्म पॉवर व कृषी यंत्रसामग्री, फुलांच्या पिकांमधील तण व्यवस्थापन.
- Floriculture, Landscaping, Tree Plantation, Pomology व काढणीपश्चात तंत्रज्ञान. Nagar Parishad Bharti Syllabus & Exam Pattern 2026
१०. सहायक ग्रंथपाल (Assistant Librarian)
- सुधारित परीक्षा स्वरूप: सामान्य विषयांचे 60 प्रश्न + ग्रंथालय विषयाचे 40 प्रश्न (एकूण 100 प्रश्न / 200 गुण).
- तांत्रिक अभ्यासक्रम:
- महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम, 1967 आणि त्याअनुषंगाने आलेले नियम.
- ग्रंथालय व्यवस्थापन, इतिहास, कर्तव्ये, धोरणे व तपासणी निकष.
- ग्रंथालय सेवेचे प्रकार, पद्धती, रेकॉर्ड देखभाल, वर्गीकरण, तालिकाकरण व वितरण पद्धत.
- ग्रंथालय वर्गीकरणाची गरज व पद्धती (DDC इत्यादी), पुस्तकांचे साहित्यिक प्रकार, ई-ग्रंथालय (E-Library) व सोशल मीडिया वापर.
- ग्रंथालयाची मूलभूत तत्त्वे व सिद्धांत (Five Laws of Library Science).
- ग्रंथपाल व सहायक ग्रंथपालांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या.
- ग्रंथ प्रदर्शन, कथाकथन, व्याख्याने, ग्रंथ सप्ताह आयोजन.
- महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये (सहायक अनुदान, इमारत व साधनसामग्री मान्यता) नियम, 1970.
११. अग्निशामक विमोचक / फायरमन (Fireman)
- तांत्रिक बाबी (40 प्रश्न):
- प्रथमोपचार पेटीतील साहित्य; भाजणे, अस्थिभंग (हाड मोडणे), घुसमटणे, रक्तस्राव, जखमा यांवरील तातडीचे प्रथमोपचार.
- वॉचरूममध्ये ठेवल्या जाणाऱ्या नोंदी व रेकॉर्ड, कार्यपद्धती, संदेश वहन व नोंदवही अद्ययावत ठेवणे.
- अग्निशामक पदाची कर्तव्ये, जबाबदाऱ्या व ड्रायव्हर ऑपरेटर सहकार्य.
- अग्निशमन दलातील शिस्त, ड्युटीचे नियम, संकटकालीन प्रसंगाचे निर्णय व्यवस्थापन. Nagar Parishad Bharti Syllabus & Exam Pattern 2026
- सर्व प्रकारची अग्निशामक यंत्रे (Fire Extinguishers) व अत्याधुनिक बचाव साधनांची हाताळणी.
६. परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या टिप्स
- तांत्रिक घटकांवर विशेष भर द्या: तांत्रिक पदांसाठी 40 प्रश्न (80 गुण) हे तुमच्या मेरिटसाठी निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे संबंधित ट्रेड किंवा पदवीच्या पुस्तकांचा सखोल अभ्यास करा.
- समान गुणांचे वेटेज: अतांत्रिक पदांसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता या चारही विषयांना प्रत्येकी 50 गुणांचे समान वेटेज असल्याने एकाही विषयाकडे दुर्लक्ष करू नका.
- नियमित सराव व मॉक टेस्ट: 2 तासांमध्ये 100 प्रश्न सोडवण्याचा सराव करा, जेणेकरून वेळेचे योग्य नियोजन होईल.
नगरपरिषद प्रशासनाने जारी केलेल्या या अधिकृत सुधारित अभ्यासक्रमानुसार आतापासूनच आपल्या अभ्यासाचे नियोजन करा आणि यशाकडे वाटचाल करा! Nagar Parishad Bharti Syllabus & Exam Pattern 2026
