KDMC Fireman Bharti 2026 : KDMC फायरमन भरती 2026: मैदानी चाचणीचे निकष आणि संपूर्ण माहिती

KDMC Fireman Bharti 2026 : KDMC फायरमन भरती 2026: मैदानी चाचणीचे निकष आणि संपूर्ण माहिती

KDMC Fireman Bharti 2026: मैदानी चाचणीचे निकष आणि संपूर्ण माहिती | Studyflow Updates

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, Studyflow Updates वर तुमचे स्वागत आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC) अंतर्गत सरळसेवा भरती 2025 ची प्रक्रिया सुरू असून, यामधील अग्निशमन विभागाच्या प्रक्रियेबाबत एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे.
अग्निशामक (फायरमन) आणि चालक यंत्रचालक (ड्रायव्हर कम ऑपरेटर) या दोन पदांसाठी होणाऱ्या शारीरिक आणि मैदानी चाचणीचे निकष महानगरपालिकेने स्पष्ट केले आहेत. या परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची माहिती असून, खाली सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

निवड प्रक्रिया आणि पात्रतेचे निकष

  • KDMC सरळसेवा भरती अंतर्गत 21 संवर्गांसाठी ऑनलाइन परीक्षा 09/09/2025 ते 12/09/2025 या कालावधीत पार पडली होती.
  • फायरमन आणि ड्रायव्हर कम ऑपरेटर या पदांसाठी 100 गुणांची लेखी परीक्षा आणि 100 गुणांची मैदानी चाचणी अशा दोन टप्प्यात निवड प्रक्रिया राबवली जात आहे.
  • महत्त्वाची अट: लेखी परीक्षेत किमान 45% गुण मिळवणारे उमेदवारच पुढील शारीरिक आणि मैदानी चाचणीसाठी पात्र ठरणार आहेत.

मैदानी चाचणीचे स्वरूप: पुरुषांसाठी

कल्याण डोंबिवली महानगरपालिका सेवा प्रवेश नियम 2021 नुसार, पात्र पुरुष उमेदवारांसाठी खालीलप्रमाणे मैदानी चाचणी घेण्यात येईल:

  • 1600 मीटर धावणे: उमेदवारांना 1600 मीटरचे अंतर वेळेत पूर्ण करावे लागेल.
  • शिडीवर चढणे आणि उतरणे: जमिनीपासून 33 फूट उंचीवरील खिडकीला लावलेल्या (46.4 इंचाच्या) ॲल्युमिनियम एक्सटेन्शन शिडीवरून खिडकीपर्यंत वर चढणे आणि त्याच शिडीने खाली उतरावे लागेल. (ही शिडी आरंभ रेषेपासून 20 फूट अंतरावर असेल).
  • वजन घेऊन धावणे (Dummy Carry): 50 किलोग्रॅम वजनाची मानवी प्रतिकृती (Dummy) खांद्यावर घेऊन दिलेल्या चौकोनी मार्गाने 60 मीटर अंतर धावायचे आहे.
  • रस्सीवर चढणे: 20 फूट उंचीपर्यंत रस्सीवर चढणे आणि उतरणे.
  • पुल-अप्स (Pull-ups): उमेदवारांना 20 पुल-अप्स काढावे लागतील.  KDMC Fireman Bharti 2026

मैदानी चाचणीचे स्वरूप: महिलांसाठी

महिला उमेदवारांसाठी मैदानी चाचणीचे निकष खालीलप्रमाणे आहेत:

  • 800 मीटर धावणे: महिलांना 800 मीटर अंतर धावावे लागेल.
  • शिडीवर चढणे आणि उतरणे: जमिनीपासून 33 फूट उंचीवरील खिडकीला लावलेल्या (46.4 इंचाच्या) ॲल्युमिनियम एक्सटेन्शन शिडीवरून खिडकीपर्यंत वर चढून त्याच शिडीने खाली उतरणे.
  • वजन घेऊन धावणे (Dummy Carry): 40 किलोग्रॅम वजनाची मानवी प्रतिकृती खांद्यावर घेऊन दिलेल्या चौकोनी मार्गाने 60 मीटर अंतर धावणे.
  • गोळा फेक: 4 किलोग्रॅम वजनाचा गोळा फेकणे.
  • लांब उडी (Long Jump): दिलेल्या निकषानुसार लांब उडी मारावी लागेल.
  • पुश-अप्स (Push-ups): 10 पुश-अप्स (जोर काढणे) आवश्यक आहेत.  KDMC Fireman Bharti 2026

मैदानी चाचणीचे प्रशासकीय नियोजन

ही मैदानी चाचणी पारदर्शक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी महानगरपालिकेने विशेष तयारी सुरू केली आहे:

  • या संदर्भात माननीय आयुक्त श्री. अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली 10/06/2026 रोजी दुपारी 12:00 वाजता एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
  • मैदान आणि धावपट्टी: सुयोग्य मैदानाची निवड करणे, 1600 मीटर व 800 मीटरची धावपट्टी तयार करणे आणि लांब उडीसाठी व्यवस्था करण्याची जबाबदारी अति. शहर अभियंता श्री. जगदीश कोरे यांच्याकडे आहे.
  • विद्युत व्यवस्था: मैदानावर सर्व विद्युत सुविधा पुरवण्याचे काम श्री. प्रशांत भागवत पाहतील.
  • साहित्याची व्यवस्था: ॲल्युमिनियम शिडी, 20 फुटांची रस्सी आणि 50 व 40 किलोग्रॅम वजनाच्या मानवी प्रतिकृती (Dummy) बनवण्याची जबाबदारी उप मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. नामदेव चौधरी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
  • या व्यतिरिक्त पुरुष व महिलांच्या सर्व चाचण्यांसाठी परीक्षकांची नेमणूक करण्यासाठी उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांच्या समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. या सर्व अधिकाऱ्यांना त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांमार्फत योग्य नियोजनाद्वारे काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
    उमेदवारांनी आतापासूनच या सर्व निकषांनुसार आपल्या मैदानी चाचणीचा सराव सुरू करावा. भरती प्रक्रियेच्या पुढील सर्व अपडेट्ससाठी Studyflow Updates ला भेट देत राहा!  KDMC Fireman Bharti 2026

Kamgar Vibhag Bharti 2026 Update

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post