MAHA TET Exam Online : टीईटी (TET) परीक्षा आता ऑनलाईन होणार! पेपरफुटीचा तपास SIT कडे; दोषींवर ‘मकोका’ लावणार: शिक्षणमंत्री दादा भुसे यांची मोठी घोषणा
मुंबई:
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या टीईटी पेपरफुटी प्रकरणाची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे. यापुढे टीईटी परीक्षा पारदर्शक पद्धतीने घेण्यासाठी आगामी वर्षापासून ती ऑनलाईन (Online) पद्धतीने घेतली जाईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधानपरिषदेत केली आहे.
तसेच, या पेपरफुटी प्रकरणाचा तपास आता ‘एसआयटी’ (SIT – Special Investigation Team) कडे सोपवण्यात आला असून, हा संघटित गुन्हेगारीचा प्रकार असल्याने संबंधित आरोपींवर ‘मकोका’ (MCOCA) अंतर्गत कडक कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांसाठी आणि परीक्षे संदर्भातील ४ मोठे निर्णय:
1. पुढील वर्षापासून परीक्षा ऑनलाईन होणार:
टीईटी आणि इतर परीक्षांमध्ये होणारे गैरप्रकार आणि पेपरफुटी पूर्णपणे रोखण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षापासून टीईटी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल. यासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांचा आणि तंत्रज्ञानाचा संपूर्ण आराखडा लवकरच तयार केला जाईल, असे आश्वासन शिक्षणमंत्र्यांनी दिले आहे. MAHA TET Exam Online
2. फेरपरीक्षेसाठी कोणतेही शुल्क नाही:
ज्या विद्यार्थ्यांचे पेपरफुटीमुळे नुकसान झाले आहे, त्यांच्यासाठी टीईटीची फेरपरीक्षा (Re-exam) अत्यंत पारदर्शक आणि शिस्तबद्ध वातावरणात घेतली जाईल. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, या फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणतेही अतिरिक्त परीक्षा शुल्क (Exam Fee) आकारले जाणार नाही.
3. दोषींवर ‘मकोका’ आणि नवीन कायद्यांतर्गत कारवाई:
हा पेपरफुटीचा गुन्हा केवळ साधी चोरी नसून एक संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे. त्यामुळे आरोपींवर ‘मकोका’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) लावण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती नेमली जाणार आहे. तसेच, आरोपींवर ‘भारतीय न्याय संहिता’ (BNS) आणि ‘स्पर्धा परीक्षा व परीक्षांमधील गैरप्रकार प्रतिबंधक कायद्या’नुसार कठोर कारवाई केली जात आहे. MAHA TET Exam Online
4. 3 आरोपींना अटक; बिहार, दिल्लीत तपास सुरू:
या संपूर्ण गैरप्रकाराबाबत कोकणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात 3 मुख्य आरोपींना अटक केली आहे. या रॅकेटचे धागेदोरे इतर राज्यांशी जोडलेले असल्याने तपासासाठी बिहार, हरियाणा आणि दिल्ली येथे पोलिसांची स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली आहेत.
विधिमंडळात विरोधक आक्रमक, चौकशीची मागणी
टीईटी पेपरफुटीच्या मुद्द्यावरून विधानपरिषद आणि विधानसभेत विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. महाविकास आघाडीच्या (MVA) आमदारांनी या प्रकरणाची सीबीआय (CBI) चौकशी करण्याची मागणी केली, तसेच नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी लावून धरली.
शिवसेसह विरोधी पक्षांच्या आमदारांनी नियम 289 अंतर्गत दिवसाचे इतर सर्व कामकाज बाजूला ठेवून यावर तातडीने चर्चा घडवून आणण्याची मागणी केली होती. मात्र, सभापती राम शिंदे यांनी ही मागणी फेटाळल्यामुळे विधानपरिषदेत प्रचंड गोंधळ झाला. विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे सभागृहाचे कामकाज 30 मिनिटांसाठी (अर्धा तास) तहकूब करावे लागले होते. तर दुसरीकडे विधानसभेतही महाविकास आघाडीच्या आमदारांनी या मुद्द्यावर तीव्र निषेध नोंदवत सभागृहातून काढता पाय घेतला (सभ्यात्याग केला). MAHA TET Exam Online
विद्यार्थ्यांनी काय लक्षात ठेवावे?
शासनाने दिलेल्या माहितीनुसार, टीईटी परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रामाणिक विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ दिले जाणार नाही. फेरपरीक्षा पूर्णपणे पारदर्शक असेल आणि भविष्यातील ऑनलाईन परीक्षेमुळे पेपरफुटीच्या गैरप्रकारांना चाप बसेल. विद्यार्थ्यांकडून फेरपरीक्षेसाठी कोणतेही पैसे घेतले जाणार नसल्याने विद्यार्थ्यांना आर्थिक फटका बसणार नाही. MAHA TET Exam Online