MJP Exam Postponed नेमके कारण काय ?
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (Maharashtra Jeevan Pradhikaran – MJP) भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे.
प्राधिकरणाने नुकतेच एक प्रसिद्धीपत्रक जाहीर करून २५, २६ आणि २७ फेब्रुवारी २०२६ रोजी नियोजित केलेल्या परीक्षा पुढे ढकलण्याचा (Postponed) निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दिलेल्या अधिकृत सूचनेनुसार, ज्या तारखांना MJP च्या परीक्षा नियोजित होत्या, त्याच दिवशी इतर महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षांचे (Competitive Exams) आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये RRB, ISRO आणि MPSC (Skill Test) या परीक्षांचा समावेश आहे.
एकाच दिवशी दोन परीक्षा आल्यामुळे उमेदवारांचे नुकसान होऊ नये आणि त्यांना संधी मिळावी, या उद्देशाने प्रशासनाने २६, २६ आणि २७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.
सद्यस्थितीत परीक्षा केवळ स्थगित करण्यात आल्या असून, नवीन तारखा अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. उमेदवारांनी पुढील माहितीसाठी आणि परीक्षेच्या सुधारीत वेळापत्रकासाठी www.mjp.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला नियमित भेट द्यावी, असे आवाहन मुख्य प्रशासकीय अधिकारी, गजानन गुरव यांनी केले आहे.
थोडक्यात महत्त्वाचे अपडेट्स: MJP Exam Postponed
* विभाग: महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP)
* पदांचा गट: गट-अ ते गट-क (Group A – Group C)
* जुन्या तारखा: २५, २६ आणि २७ फेब्रुवारी २०२६
* स्थगितीचे कारण: RRB, ISRO आणि MPSC परीक्षांशी तारखांची टक्कर (Clash).
* पुढील तारीख: लवकरच अधिकृत वेबसाईटवर कळवण्यात येईल.
उमेदवारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनेची वाट पहावी आणि आपला अभ्यास सुरू ठेवावा.
SSC Exam 2026 Maharashtra बद्दल वाचा.



One response to “MJP Exam Postponed : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP) भरती परीक्षा स्थगित ! जाणून घ्या नेमके कारण”
[…] महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP) भरती परी… […]