MPSC Group C Mains Syllabus in Marathi: संपूर्ण परीक्षा स्वरूप आणि अभ्यासक्रम | Studyflow Updates
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो! Studyflow Updates वर तुमचे स्वागत आहे.
तुम्ही जर महाराष्ट्र अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा (गट क) ची तयारी करत असाल, तर या परीक्षेचे स्वरूप आणि सविस्तर अभ्यासक्रम समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. आयोगाने दिलेल्या नवीन अभ्यासक्रमानुसार, आपण या लेखात सहायक मोटार वाहन निरीक्षक (AMVI) पद वगळून इतर सर्व पदांसाठी आणि AMVI पदासाठी असा दोन्ही प्रकारचा अभ्यासक्रम सोप्या भाषेत पाहणार आहोत.
भाग 1: गट क मधील सर्व पदे (सहायक मोटार वाहन निरीक्षक वगळून)
या परीक्षेसाठी एकूण 2 पेपर असतात आणि ही परीक्षा एकूण 400 गुणांची असते.
1. परीक्षा योजना (Exam Pattern)
पेपर 1 (मराठी व इंग्रजी): मराठीसाठी 50 प्रश्न आणि 100 गुण असतात (दर्जा: 12 वी).
इंग्रजीसाठी 50 प्रश्न आणि 100 गुण असतात (दर्जा: पदवी).
एकूण वेळ 1 तास असतो आणि प्रश्नांचे स्वरूप बहुपर्यायी (Objective) असते.
पेपर 2 (सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी):
यामध्ये 100 प्रश्न आणि 200 गुण असतात (दर्जा: पदवी).
प्रश्न मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असतात.
या पेपरसाठी देखील 1 तासाचा वेळ मिळतो. MPSC Group C Mains Syllabus In Marathi
2. नकारात्मक गुणदान (Negative Marking)
प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एकूण गुणांमधून 25% किंवा 1/4 गुण वजा केले जातील.
एकापेक्षा जास्त वर्तुळे रंगवल्यास किंवा अपूर्ण वर्तुळ रंगवल्यासही ते उत्तर चुकीचे मानून 25% गुण कापले जातील.
जर एखादा प्रश्न तुम्ही सोडवलाच नाही (अनुत्तरित ठेवला), तर त्यासाठी कोणतेही गुण वजा केले जाणार नाहीत. MPSC Group C Mains Syllabus In Marathi
3. पेपर 1 चा अभ्यासक्रम (Syllabus)
मराठी: सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे.
इंग्रजी (English): Common Vocabulary, Sentence structure, Grammar, use of Idioms and phrases & their meaning and comprehension of passage.
4. पेपर 2 चा अभ्यासक्रम (सामान्य क्षमता चाचणी)
हा पेपर तुमच्या सामान्य ज्ञानाची (GS) चाचणी घेतो. यात खालील घटकांचा समावेश आहे:
सामान्य बुद्धिमपन व आकलन: उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे तपासणारे प्रश्न.
चालू घडामोडी (Current Affairs): जागतिक पातळीवरील, तसेच महाराष्ट्रासह भारतातील घडामोडी. MPSC Group C Mains Syllabus In Marathi
अंकगणित व सांख्यिकी (Maths & Statistics).
माहितीचा अधिकार (RTI): माहितीचा अधिकार अधिनियम 2005 आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015.
भारतीय राज्यव्यवस्था (Polity): घटना कशी तयार झाली, प्रस्तावनेची तत्त्वे, महत्त्वाची कलमे, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य विधिमंडळ आणि न्यायमंडळ इत्यादी.
इतिहास (History): आधुनिक भारताचा आणि विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास (1885-1947). समाज सुधारकांचे कार्य, स्वातंत्र्यपूर्व काळातील वर्तमानपत्रे, शिक्षण आणि राष्ट्रीय चळवळी.
भूगोल व पर्यावरण (Geography & Environment): भारत आणि महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल, हवामान, नद्या, खनिजे आणि लोकसंख्येचे स्थानांतर. तसेच पर्यावरण, प्रदूषणे आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे संधारण.
सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान: भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry), प्राणीशास्त्र (Zoology), वनस्पतीशास्त्र (Botany), दूर संवेदन (Remote Sensing/GIS) आणि माहिती तंत्रज्ञान (ICT).
अर्थव्यवस्था व नियोजन: समग्रलक्षी अर्थशास्त्र (Macroeconomics), भारतीय अर्थव्यवस्था, शेती व ग्रामीण विकास, बँकिंग क्षेत्र, सार्वजनिक वित्त, उद्योग, आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था. MPSC Group C Mains Syllabus In Marathi
भाग 2: सहायक मोटार वाहन निरीक्षक (AMVI) मुख्य परीक्षा
जर तुम्ही AMVI पदासाठी अर्ज केला असेल, तर तुमच्या परीक्षेचे स्वरूप थोडे वेगळे आहे.
1. परीक्षा योजना (Exam Pattern)
या परीक्षेसाठी फक्त 1 च पेपर असतो.
विषय: यंत्र अभियांत्रिकी व स्वयंचल अभियांत्रिकी (Mechanical & Automobile Engineering).
एकूण प्रश्न: 150.
एकूण गुण: 300.
माध्यम: इंग्रजी.
वेळ: 1.5 तास (दीड तास).
नकारात्मक गुणदान: इथेही 25% किंवा 1/4 निगेटिव्ह मार्किंग लागू आहे. MPSC Group C Mains Syllabus In Marathi
2. अभ्यासक्रम (Technical Syllabus)
AMVI चा पेपर पूर्णपणे टेक्निकल असतो. आयोगाने दिलेले 15 प्रमुख घटक खालीलप्रमाणे आहेत:
- Strength of Materials: Stresses, strain, bending moment, torsion.
- Manufacturing Processes: Metal cutting, welding, plastics processing, CNC.
- Theory of Machines: Kinematics, friction, clutch, gears, gyroscopes.
- Hydraulics and hydraulic machineries: Fluid properties, turbines, pumps.
- Thermal Engineering and refrigeration: Thermodynamics, air compressors, AC & heat pumps.
- Industrial Engineering and Management: Plant layouts, statistical quality control.
- Power Developing Systems: Engine types (SI/CI), fuel pumps, ECU, ignition systems.
- Cooling and Lubrication systems: Engine cooling and lubrication types and troubleshooting.
- Transmission systems: Clutches, gearboxes (manual/auto), faults and repairs.
- Steering Systems and starting drives: Power steering, wheel alignment, alternator, starters.
- Differential, rear axle and brakes: Axle types, disk/drum brakes, ABS system.
- Vehicle maintenance and Transport Management: Servicing, emissions, transport operations.
- Automobile Battery, Electrical and Electronic systems: Battery maintenance, alternators.
- Introduction to Electric Vehicles (EVs): Battery Management Systems, energy storage.
- Motor Vehicle Act and Road Safety: Licensing, RTO structure, Insurance, vehicle taxation.
मित्रांनो, हा संपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला येणाऱ्या मुख्य परीक्षेची योग्य दिशा ठरवण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. सर्व विषयांचे नियोजन करा आणि जास्तीत जास्त सराव करा.
भरती प्रक्रियेच्या अशाच अचूक आणि फास्ट अपडेट्ससाठी Studyflow Updates ला नक्की भेट देत राहा. MPSC Group C Mains Syllabus In Marathi

