MPSC Talathi Bharti Update 2026 : सरळसेवा भरतीला वेग: तलाठी भरतीची जबाबदारी आता MPSC कडे, 1700 पदांची मोठी भरती!

MPSC Talathi Bharti Update 2026 : सरळसेवा भरतीला वेग: तलाठी भरतीची जबाबदारी आता MPSC कडे, 1700 पदांची मोठी भरती!

MPSC Talathi Bharti Update 2026 : सरळसेवा भरतीला वेग, 1700 पदांसाठी मागणीपत्र देण्याचे आदेश

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, Studyflow Updates वर तुमचे स्वागत आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या सरळसेवा भरती प्रक्रियेला आता मोठा वेग आला असून, तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) पदाची भरती प्रक्रिया आता थेट महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) राबवली जाणार आहे.

राज्यातील तलाठ्यांची तब्बल 1700 पदे लवकरच भरली जाणार असून, शासनाने या प्रक्रियेला गती देण्यासाठी सर्व विभागीय आयुक्तांना अत्यंत महत्त्वाचे आदेश दिले आहेत. चला तर मग, या नवीन शासन निर्णयाची आणि भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती सोप्या भाषेत समजून घेऊया.  MPSC Talathi Bharti Update 2026

खाजगी कंपन्यांना डच्चू; आता MPSC द्वारे होणार पारदर्शक परीक्षा

शासनाचा प्रशासकीय डोलारा अनेक संवर्गांमध्ये विभागलेला आहे. राज्याच्या 33 विभागांमधील सुमारे 110 आस्थापनांमध्ये 3600 हून अधिक संवर्ग आहेत. तसेच सरळसेवा भरती संदर्भात 1400 हून अधिक सेवाप्रवेश नियम लागू आहेत.

यापूर्वी अशा भरती परीक्षा खाजगी संस्थांकडून (TCS/IBPS इ.) घेतल्या जात होत्या. मात्र, या परीक्षांदरम्यान अनेक गैरप्रकार झाल्याचे समोर आले आणि विद्यार्थ्यांकडून यावर तीव्र टीका झाली. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये आणि भरती प्रक्रियेत पारदर्शकता यावी, यासाठी शासनाने मोठा निर्णय घेत सरळसेवा भरतीची जबाबदारी आता ‘एमपीएससी’ (MPSC) कडे सोपवली आहे. त्यामुळे आता तलाठी भरती प्रक्रिया MPSC च्या माध्यमातून अतिशय काटेकोरपणे आणि पारदर्शक वातावरणात पार पडेल.          MPSC Talathi Bharti Update 2026

1700 पदांसाठी मोठी संधी !

सध्या राज्यात ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) संवर्गातील पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. उपलब्ध माहितीनुसार, या नवीन प्रक्रियेद्वारे राज्यात तब्बल 1700 तलाठी पदे भरली जाणार आहेत. ही सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे.    MPSC Talathi Bharti Update 2026

8 मे पर्यंत मागणीपत्र सादर करण्याचे आदेश

महसूल व वन विभागाच्या 2 एप्रिलच्या शासन निर्णयानुसार महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध (Staffing Pattern) निश्चित करण्यात आला आहे. यानुसार रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे.
या प्रक्रियेला गती देण्यासाठी शासनाने राज्यातील सर्व विभागीय कार्यालयांना पत्र पाठवले आहे. या पत्रात स्पष्ट निर्देश दिले आहेत की, कोणत्याही परिस्थितीत 8 मे पर्यंत सर्व रिक्त पदांचे मागणीपत्र (Demand Letter) महाराष्ट्र लोकसेवा आयोगास (MPSC) सादर करावे. सामान्य प्रशासन विभागाने सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना या सूचना दिल्या असल्यामुळे भरती प्रक्रियेला आता खऱ्या अर्थाने वेग येणार आहे.    MPSC Talathi Bharti Update 2026

बिंदू नामावली (Roster) आणि पेसा क्षेत्रासाठी स्वतंत्र मागणीपत्र

शासनाच्या आदेशानुसार भरती प्रक्रिया राबवताना खालील महत्त्वाच्या बाबींची पूर्तता करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत:
बिंदू नामावलीची तपासणी: जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता सर्वात आधी बिंदू नामावली (Roster) मागासवर्गीय कक्षाकडून तपासून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पेसा (PESA) आणि बिगर पेसा क्षेत्राचे वर्गीकरण: ज्या जिल्ह्यांमध्ये ‘पेसा’ (PESA – पेसा कायदा लागू असलेले आदिवासी क्षेत्र) आणि ‘बिगर पेसा’ क्षेत्र लागू आहे, त्या ठिकाणच्या क्षेत्रांचे स्वतंत्र मागणीपत्र तयार करावे.

उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये एकूण रिक्त पदांचे एकत्रित मागणीपत्र विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत MPSC ला पाठवले जाणार आहे.

विद्यार्थ्यांसाठी पुढे काय?

मित्रांनो, प्रशासकीय पातळीवरील या वेगवान हालचाली पाहता, लवकरच MPSC मार्फत तलाठी भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होण्याची दाट शक्यता आहे. खाजगी कंपन्यांऐवजी MPSC परीक्षा घेणार असल्याने परीक्षेचा दर्जा आणि काठिण्यपातळी MPSC च्या पॅटर्ननुसार असू शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आतापासूनच आपल्या अभ्यासाचे नियोजन करणे आणि तयारीला लागणे आवश्यक आहे.    MPSC Talathi Bharti Update 2026

भरतीबाबतचे सर्व नवीन अपडेट्स, अभ्यासक्रम आणि जाहिरातीची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी Studyflow Updates ला भेट देत राहा!

हस्ताक्षर तज्ज्ञ भरती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post