RRB ALP Recruitment 2026 | रेल्वे मध्ये असिस्टंट लोको पायलट पदांच्या 11127 जागांसाठी बंपर भरती

RRB ALP Recruitment 2026 | रेल्वे मध्ये असिस्टंट लोको पायलट पदांच्या 11127 जागांसाठी बंपर भरती

RRB ALP Recruitment 2026 | रेल्वे मध्ये असिस्टंट लोको पायलट पदांच्या 11127 जागांसाठी बंपर भरती !

रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB) ने असिस्टंट लोको पायलट (ALP) पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात (CEN No.: 01/2026) प्रसिद्ध केली आहे. जे विद्यार्थी रेल्वेमध्ये नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहत आहेत त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. या लेखामध्ये आपण या भरतीविषयी सर्व महत्त्वाची माहिती जसे की पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा स्वरूप आणि अर्ज करण्याची पद्धत सविस्तरपणे पाहणार आहोत.

भरतीचा थोडक्यात तपशील (Overview)

संस्थेचे नाव: रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB)
पदाचे नाव: असिस्टंट लोको पायलट (ALP)
एकूण रिक्त पदे: 11127 जागा
वेतन (Salary): 19900 रुपये (Level-2, 7th CPC नुसार)
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन (Online)

महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख: 15.05.2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14.06.2026 (रात्री 11:59 पर्यंत)
फी भरण्याची शेवटची तारीख: 16.06.2026
अर्जात बदल (Modification) करण्याची तारीख: 17.06.2026 ते 26.06.2026  RRB ALP Recruitment 2026

Official website : https://www.rrbapply.gov.in/

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

या पदासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे खालीलपैकी एक पात्रता असणे आवश्यक आहे:
10वी पास (Matriculation/SSLC) आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI (NCVT/SCVT).
किंवा 10वी पास (Matriculation/SSLC) आणि मान्यताप्राप्त अप्रेंटिसशिप (Course Completed Act Apprenticeship).
किंवा 10वी पास (Matriculation/SSLC) आणि मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये 3 वर्षांचा डिप्लोमा.
किंवा वर नमूद केलेल्या इंजिनिअरिंग विषयांमधील पदवी (Degree in Engineering).    RRB ALP Recruitment 2026

वयोमर्यादा (Age Limit)

वय मोजण्याची तारीख: 01.07.2026 रोजी तुमचे वय मोजले जाईल.
खुला गट (UR / EWS): उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे.
वयातील सूट (Age Relaxation):
   OBC (NCL) उमेदवारांसाठी: 3 वर्षांची सूट.
   SC / ST उमेदवारांसाठी: 5 वर्षांची सूट.

मेडिकल स्टॅंडर्ड (Medical Standard)

ALP या पदासाठी विद्यार्थ्यांचे मेडिकल स्टॅंडर्ड खूप कडक असते.
उमेदवाराचे मेडिकल स्टॅंडर्ड A-1 असणे अनिवार्य आहे.
डोळ्यांची दृष्टी (Distant Vision) चष्म्याविना 6/6 असणे गरजेचे आहे.
सर्वांत महत्त्वाची अट: ज्या उमेदवारांनी LASIK सर्जरी किंवा इतर कोणतीही डोळ्यांची सर्जरी केली आहे, ते या पदासाठी अर्ज करू शकत नाहीत.

परीक्षा शुल्क (Application Fee)

General / OBC उमेदवार: 500 रुपये. (यातून CBT-1 परीक्षा दिल्यास 400 रुपये बँक चार्जेस वजा करून परत मिळतील) .
SC / ST / Ex-SM / महिला / अल्पसंख्याक / EBC उमेदवार: 250 रुपये. (CBT-1 परीक्षा दिल्यास ही संपूर्ण रक्कम बँक चार्जेस वजा करून परत मिळेल) .
महत्त्वाची नोंद: जे विद्यार्थी पहिली परीक्षा (CBT-1) देणार नाहीत, त्यांना कोणतीही फी परत मिळणार नाही.  RRB ALP Recruitment 2026

निवड प्रक्रिया (Selection Process)

उमेदवारांची निवड एकूण 5 टप्प्यांमध्ये केली जाईल:
1. First Stage CBT (CBT-1): ही एक लेखी परीक्षा असेल ज्यामध्ये 75 प्रश्न असतील आणि 60 मिनिटांचा वेळ दिला जाईल.
2. Second Stage CBT (CBT-2): या परीक्षेत दोन भाग असतील. Part-A मध्ये 100 प्रश्न (90 मिनिटे) आणि Part-B मध्ये 75 प्रश्न (60 मिनिटे) असतील. एकूण 175 प्रश्न आणि 2 तास 30 मिनिटांचा वेळ असेल.
3. Computer Based Aptitude Test (CBAT): यात निगेटिव्ह मार्किंग नसते.
4. Document Verification (DV): कागदपत्रांची पडताळणी.
5. Medical Examination (ME): वैद्यकीय चाचणी.
दोन्ही लेखी परीक्षांमध्ये (CBT-1 व CBT-2) चुकीच्या उत्तरासाठी 1/3 निगेटिव्ह मार्किंग लागू राहील.      RRB ALP Recruitment 2026

अर्ज करताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी

उमेदवाराला फक्त एकाच RRB झोनमधून अर्ज करता येईल. एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास सर्व अर्ज बाद केले जातील आणि पुढील परीक्षांसाठी बंदी घातली जाईल.
उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना स्वतःचा चालू मोबाईल नंबर आणि Email ID देणे आवश्यक आहे.
अर्ज सबमिट करताना Live Photo अपलोड करावा लागेल.

कृषीसेवक (सहायक कृषी अधिकारी भरती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post