TDC Wachman Updated Exam 2026 : Tribal Development Department Recruitment 2026: चौकीदार (गटड) सुधारित वेळापत्रक जाहीर; पहा संपूर्ण वेळापत्रक व महत्त्वाच्या सूचना
Tribal Development Department Bharti 2026: आदिवासी विकास आयुक्तालय, महाराष्ट्र शासन, नाशिक यांच्या वतीने एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आदिवासी विकास विभागामार्फत 21.04.2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या 478 चौकीदार (गटड) पदांच्या भरतीसाठीचे सुधारित वेळापत्रक (Revised Exam Schedule) अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे.
जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज केला असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. परीक्षा कधी आहे, तुमची शिफ्ट कोणती असेल आणि प्रवेशपत्र (Hall Ticket) कधी मिळणार, याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. TDC Wachman Updated Exam 2026
भरतीचा संक्षिप्त तपशील (Recruitment Overview)
विभाग: आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन (Tribal Development Department)
पदाचे नाव: चौकीदार (गटड) Watchman (GroupD)
एकूण पदे: 478 पदे
जाहिरात दिनांक: 21.04.2026
सुधारित सूचना दिनांक: 13 जुलै 2026
परीक्षा पद्धत: ऑनलाईन लेखी परीक्षा (CBT Mode) TDC Wachman Updated Exam 2026
गटनिहाय सुधारित वेळापत्रक (Project Office Wise Exam Dates & Shifts)
विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी वेगवेगळ्या प्रकल्प कार्यालयांचे (Project Offices) गट पाडण्यात आले असून त्यानुसार परीक्षेच्या तारखा आणि शिफ्ट खालील तक्त्यामध्ये सविस्तर दिल्या आहेत:
गट (Group) प्रकल्प कार्यालय (Project Office) परीक्षेचा दिनांक (Exam Date) शिफ्ट (Shift)
- 1 कळवण + चिमुर 28 जुलै 2026 Shift 1
- 2 चंद्रपूर + वर्धा + नागपूर + भंडारा 28 जुलै 2026 Shift 2
- 3 अकोला + घोडेगाव 29 जुलै 2026 Shift 1
- 4 पुसद + राजुर + देवरी + यावल + भामरागड 29 जुलै 2026 Shift 2
- 5 तळोदा + जव्हार + शहापूर + सोलापूर + किनवट + कळमनुरी 30 जुलै 2026 Shift 1
- 6 डहाणू + छ. संभाजीनगर (औरंगाबाद) 30 जुलै 2026 Shift 2
- 7 धारणी + नंदुरबार + पेण 31 जुलै 2026 Shift 1
- 8 धुळे + गडचिरोली + पांढरकवडा + अहेरी 31 जुलै 2026 Shift 2
- 9 नाशिक (शिफ्ट 01) 01 ऑगस्ट 2026 Shift 1
- 10 नाशिक (शिफ्ट 02) 01 ऑगस्ट 2026 Shift 2 TDC Wachman Updated Exam 2026
शिफ्टनुसार परीक्षेची वेळ (Exam Shift Timings)
परीक्षेसाठी रिपोर्टिंग टाईम (हजेरीची वेळ) आणि गेट बंद होण्याची वेळ अत्यंत महत्त्वाची असते. जर तुम्ही वेळेवर पोहोचले नाही तर परीक्षेस बसू दिले जात नाही. त्यामुळे खालील वेळा काळजीपूर्वक नोंदवून घ्या:
1. शिफ्ट 1 (सकाळची सत्र)
सर्वसाधारण उमेदवार:
Reporting Time: सकाळी 8.00 वा.
Gate Close Time: सकाळी 9.30 वा.
Exam Start Time: सकाळी 10.00 वा.
Exam End Time: दुपारी 12.00 वा.
दिव्यांग उमेदवार (PwD Candidates):
Reporting Time: सकाळी 8.00 वा.
Gate Close Time: सकाळी 9.30 वा.
Exam Start Time: सकाळी 10.00 वा.
Exam End Time: दुपारी 12.40 वा. (दिव्यांग उमेदवारांना 40 मिनिटे जादा वेळ मिळेल).
2. शिफ्ट 2 (दुपारचे सत्र)
सर्वसाधारण उमेदवार:
Reporting Time: दुपारी 1.00 वा.
Gate Close Time: दुपारी 2.30 वा.
Exam Start Time: दुपारी 3.00 वा.
Exam End Time: संध्याकाळी 5.00 वा. TDC Wachman Updated Exam 2026
दिव्यांग उमेदवार (PwD Candidates):
Reporting Time: दुपारी 1.00 वा.
Gate Close Time: दुपारी 2.30 वा.
Exam Start Time: दुपारी 3.00 वा.
Exam End Time: संध्याकाळी 5.40 वा. (दिव्यांग उमेदवारांना 40 मिनिटे जादा वेळ मिळेल).
प्रवेशपत्र (Hall Ticket / Admit Card) कधी आणि कोठे मिळणार?
उमेदवारांना त्यांचे प्रवेशपत्र (Admit Card) परीक्षेच्या 7 दिवस अगोदर उपलब्ध करून दिले जाईल.
प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ:
1. https://tribal.maharashtra.gov.in
2. https://tdcwatchman2026.cbtexam.in
उमेदवारांनी वरील दोन्हीपैकी कोणत्याही लिंकवर जाऊन आपले हॉल तिकीट आणि परीक्षेच्या मार्गदर्शक सूचना डाऊनलोड कराव्यात.
विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या सूचना (Important Instructions for Candidates)
1. स्वतंत्र अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी नियम: ज्या विद्यार्थ्यांनी वरील तक्त्यात नमूद केलेल्या वेगवेगळ्या गटांनुसार किंवा एकापेक्षा जास्त प्रकल्प कार्यालयांसाठी स्वतंत्र (वेगवेगळे) अर्ज केले असतील, त्यांची परीक्षा त्यात्या गटानुसार वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांवर होईल. अशा उमेदवारांना प्रत्येक गटासाठी वेगवेगळे प्रवेशपत्र (Separate Hall Tickets) उपलब्ध करून दिले जातील, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
2. नियुक्ती व संपूर्ण प्रक्रिया: गटड (चौकीदार) या पदाचे नियुक्ती प्राधिकारी हे संबंधित प्रकल्प अधिकारी (Project Officer), एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय हे आहेत. त्यामुळे ऑनलाईन परीक्षा घेणे, परीक्षा केंद्रांचे नियोजन करणे, केंद्रावरील समन्वयक, निकाल प्रसिद्ध करणे, निवडसूची तयार करणे, कागदपत्र पडताळणी (Document Verification) आणि भरती प्रक्रियेशी संबंधित इतर सर्व कार्यवाही संबंधित प्रकल्प अधिकारीच करणार आहेत.
अधिकृत जाहीर सूचना जारी करणारे:
लीना बनसोड (भाप्रसे), आयुक्त, आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य, नाशिक.
विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेला जाताना वेळेचे तंतोतंत पालन करा आणि ७ दिवस आधी आपले हॉल तिकीट डाऊनलोड करायला विसरू नका. ही माहिती तुमच्या इतर मित्रांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून कोणाचीही परीक्षा चुकणार नाही! TDC Wachman Updated Exam 2026

