UPSC IFS Mahajyoti Scheme 2026 : तुम्ही जर भारतीय वन सेवा (UPSC IFS) मुख्य परीक्षा २०२५ उत्तीर्ण केली असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महाज्योती (Mahajyoti) संस्थेने मुलाखतीच्या (Personality Test) तयारीसाठी पात्र विद्यार्थ्यांना एकरकमी अर्थसहाय्य देण्याची योजना जाहीर केली आहे.
चला तर मग, या योजनेची सविस्तर माहिती, पात्रता आणि अर्ज प्रक्रियेबद्दल जाणून घेऊया.
योजनेचे स्वरूप आणि पात्रता (Eligibility Criteria) UPSC IFS Mahajyoti Scheme 2026
* विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
* उमेदवार इतर मागास वर्ग (OBC), विमुक्त जाती-भटक्या जमाती (VJNT) किंवा विशेष मागास प्रवर्गातील (SBC) नॉन-क्रिमीलेअर (Non-Creamy Layer) गटातील असावा.
* विद्यार्थ्याने भारतीय वन सेवा (UPSC IFS) मुख्य परीक्षा २०२५ उत्तीर्ण केलेली असावी (ज्यांचा निकाल २४/०२/२०२६ रोजी लागला आहे).
* जर विद्यार्थ्याला याच परीक्षेसाठी सारथी (SARTHI), पुणे किंवा इतर कोणत्याही संस्थेकडून अर्थसहाय्य मिळत असेल, तर ते या योजनेसाठी अपात्र ठरतील.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे (Required Documents) UPSC IFS Mahajyoti Scheme 2026
* आधार कार्ड (पुढील आणि मागील बाजूसह).
* जातीचा दाखला (Caste Certificate).
* वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र (Non-Creamy Layer Certificate).
* भारतीय वन सेवा मुख्य परीक्षा २०२५ चे प्रवेश पत्र (Admit Card).
* UPSC मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या निकालाची प्रत (ज्यामध्ये बैठक क्रमांक ठळक केलेला असावा).
अर्ज कसा करावा ? (How to Apply) UPSC IFS Mahajyoti Scheme 2026
* महाज्योतीच्या अधिकृत वेबसाईटवर जा: www.mahajyoti.org.in.
* वेबसाईटवरील ‘Notice Board’ मध्ये जाऊन “Application Invited For Financial Assistance Those Who Qualified For UPSC Indian Forest Services Personality Test/ Interview – 2025” या लिंकवर क्लिक करा आणि ऑनलाईन अर्ज भरा.
* अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे स्वतः साक्षांकित (Self-attested) करून स्पष्ट दिसतील अशी स्कॅन करून जोडावीत.
महत्त्वाच्या अटी आणि शर्ती (Important Conditions)
* अंतिम दिनांक: ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १०/०४/२०२६ आहे.
* पोस्टाने किंवा ई-मेलद्वारे पाठवलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
* विद्यार्थ्याचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे.
* चालू आर्थिक वर्षात महाज्योतीच्या इतर कोणत्याही अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेतलेले विद्यार्थी या योजनेसाठी पात्र नसतील.
* कोणतीही चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती दिल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
* काही तांत्रिक अडचण आल्यास तुम्ही महाज्योतीच्या हेल्पलाईन क्रमांक ०७१२-२८७०१२० किंवा ०७१२-२८७०१२१ वर संपर्क करू शकता, तसेच mahajyotingp@gmail.com वर ई-मेल करू शकता. UPSC IFS Mahajyoti Scheme 2026
विद्यार्थ्यांसाठी खास टीप:
मित्रांनो, मुलाखतीची (Personality Test) तयारी ही केवळ तुमच्या पुस्तकी ज्ञानाची नसून तुमच्या निर्णयक्षमतेची आणि व्यक्तिमत्त्वाची चाचणी असते. महाज्योतीकडून मिळणाऱ्या या आर्थिक मदतीचा उपयोग योग्य मार्गदर्शन (Mock Interviews), दर्जेदार अभ्यास साहित्य आणि दिल्ली/पुण्यातील चांगल्या मार्गदर्शकांसाठी करा. स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा, तुमची मेहनत नक्कीच फळाला येईल ! UPSC IFS Mahajyoti Scheme 2026
पुणे महानगरपालिका भरती


