WCD Recruitment 2026 : महिला व बाल विकास विभागात ‘परिवीक्षा अधिकारी’ पदांसाठी MPSC कडे मागणीपत्र सादर; जाणून घ्या संपूर्ण माहिती व आरक्षणनिहाय जागांचा तपशील

WCD Recruitment 2026 : महिला व बाल विकास विभागात 'परिवीक्षा अधिकारी' पदांसाठी MPSC कडे मागणीपत्र सादर; जाणून घ्या संपूर्ण माहिती व आरक्षणनिहाय जागांचा तपशील

WCD Recruitment 2026: महिला व बाल विकास विभागात ‘परिवीक्षा अधिकारी’ पदांचे MPSC मागणीपत्र पाठवले जाणून घ्या संपूर्ण माहिती व आरक्षणनिहाय जागांचा तपशील

महिला व बाल विकास विभागात ‘परिवीक्षा अधिकारी’ पदांसाठी MPSC कडे मागणीपत्र सादर; स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट समोर आली आहे. महिला व बाल विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अखत्यारीतील ‘परिवीक्षा अधिकारी (Probation Officer), गटक’ या संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे (MPSC) मागणीपत्र पाठवण्याबाबतचा अधिकृत प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे.

माहितीचा अधिकार (RTI) अंतर्गत मिळालेल्या अधिकृत पत्रव्यवहारावरून ही माहिती समोर आली आहे. या भरती संदर्भातील सर्व पार्श्वभूमी, रिक्त पदांची स्थिती आणि प्रवर्गनिहाय आरक्षणाचा तपशील खालीलप्रमाणे सविस्तर समजून घेऊया.  WCD Recruitment 2026

१. मागणीपत्राची पार्श्वभूमी काय आहे?

माहिती अधिकारांतर्गत (RTI) अर्जदाराने महिला व बाल विकास विभागातील गटक संवर्गातील सरळसेवेच्या रिक्त पदांबाबत MPSC ला पाठविलेल्या मागणीपत्राची माहिती मागितली होती.
यावर महिला व बाल विकास आयुक्तालयाने दिनांक 16/09/2026 रोजी उत्तर देताना स्पष्ट केले की, परिवीक्षा अधिकारी गटक या संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत शासनाला दिनांक 23/07/2026 रोजी अधिकृत प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.  WCD Recruitment 2026

शासनाच्या निर्देशानुसार, बिंदूनामावली (Roaster) तपासून उर्वरित रिक्त पदांचे मागणीपत्र MPSC कडे पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

२. मागील भरती आणि आत्ताची परिस्थिती

  • यापूर्वी वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार रिक्त पदांच्या 80% मर्यादेत पदभरतीची जाहिरात दिनांक 14/10/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.
      
  • त्यामध्ये परिवीक्षा अधिकारी (72 पदे) आणि वरिष्ठ लिपिक (56 पदे) अशी भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती.
  •    या पदभरतीमधील पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याची कार्यवाही सध्या अंतिम टप्प्यात आहे.
  • त्यानंतर महिला व बाल विकास विभागाचा सुधारित आकृतीबंध दिनांक 10/04/2026 च्या शासन निर्णयानुसार मंजूर करण्यात आला.
  • भरती प्रक्रियेदरम्यान काही उमेदवारांनी नियुक्ती न स्वीकारल्याने किंवा राजीनामा दिल्याने प्रतीक्षा यादीचा विचार करावा लागत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष अनुशेष निश्चित होईपर्यंत, मागासवर्ग
  • कक्षाच्या दिनांक 26/07/2024 च्या अहवालानुसार उर्वरित 20% रिक्त पदे भरण्यासाठी हे मागणीपत्र पाठवण्यात येत आहे.  WCD Recruitment 2026

३. वरिष्ठ लिपिक / सांख्यिकी सहाय्यक पदांबाबत मोठा बदल

प्रचलित सेवाप्रवेश नियमांनुसार वरिष्ठ लिपिक / सांख्यिकी सहाय्यक ही पदे 50% सरळसेवा आणि 50% पदोन्नतीने भरली जात होती.
मात्र, आता विभागाने ही पदे 100% पदोन्नतीने (Promotion) भरण्याचा प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी सादर केला आहे.
त्यामुळे सध्या सरळसेवेने MPSC मार्फत केवळ परिवीक्षा अधिकारी (गटक) या पदांचे मागणीपत्र प्रस्तावित करण्यात आले आहे.

४. पदाचे नाव आणि वेतनश्रेणी

पदाचे नाव: परिवीक्षा अधिकारी (Probation Officer), गटक
वेतनश्रेणी: एस14 (S14): ₹ 38,600 ते ₹ 1,22,800

५. भरल्या जाणाऱ्या पदांचा सामाजिक व समांतर आरक्षणनिहाय सविस्तर तपशील

MPSC ला सादर करण्यात आलेल्या मागणीपत्र विवरणपत्रानुसार एकूण 18 पदांचा सामाजिक व समांतर आरक्षणनिहाय तपशील खालीलप्रमाणे आहे:

अ. क्र. प्रवर्ग / जात प्रवर्ग सर्वसाधारण महिला माजी सैनिक पदवीधर अंशकालीन कर्मचारी एकूण पदे  WCD Recruitment 2026

1 अनुसूचित जाती (SC) 1 0 0 0 1
2 अनुसूचित जमाती (ST) 1 0 0 0 1
3 विमुक्त जाती अ (VJA) 0 0 0 0 0
4 भटक्या जमाती ब (NTB) 0 0 0 0 0
5 भटक्या जमाती क (NTC) 1 0 0 0 1
6 भटक्या जमाती ड (NTD) 0 0 0 0 0
7 इतर मागास प्रवर्ग (OBC) 2 1 1 0 4
8 विशेष मागास प्रवर्ग (SBC) 0 0 0 0 0
9 आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) 1 1 0 0 2
10 सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (SEBC) 1 1 0 0 2
11 अराखीव (Open / General) 3 2 1 1 7
एकूण सर्व प्रवर्ग मिळून 10 5 2 1 18

विशेष समांतर आरक्षण (दिव्यांग आरक्षण):

एकूण पदांपैकी 1 पद दिव्यांग प्रवर्गासाठी राखीव आहे.

यामध्ये: अस्थिव्यंगता / मेंदूचा पक्षाघात (Cerebral Palsy) / कुष्ठरोगमुक्त (Leprosy Cured) / शारीरिक वाढ खुंटणे (Dwarfism) / आम्लहल्लाग्रस्त (Acid Attack Victims) / स्नायू विकृती (Muscular Dystrophy) यांचा समावेश आहे.

६. नियुक्ती प्राधिकाऱ्याचा संपर्क तपशील

  • नियुक्ती प्राधिकारी: श्रीमती वर्षा लड्डा (भा.प्र.से.), आयुक्त, महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य, पुणे.
  • कार्यालयाचा पत्ता: महिला व बाल विकास आयुक्तालय, 28, राणीचा बाग, जुन्या सर्किट हाऊसजवळ, पुणे 411001.
  • दूरध्वनी क्रमांक: 02026333812 / 02026337117  WCD Recruitment 2026
  • ईमेल आयडी: commissionerwcdest@yahoo.in

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निष्कर्ष:

महिला व बाल विकास विभागातील परिवीक्षा अधिकारी पदाची भरती प्रक्रिया आता मार्गावर आली असून आयुक्तालयाकडून मागणीपत्राचा प्रस्ताव मंत्रालयात सादर झाला आहे. त्यामुळे आगामी MPSC च्या संयुक्त गटक परीक्षेच्या जाहिरातीत किंवा स्वतंत्र जाहिरातीद्वारे या पदांची भरती प्रसिद्ध होण्याची दाट शक्यता आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी या दृष्टीने आपला अभ्यास सुरू ठेवणे आवश्यक आहे.  WCD Recruitment 2026

PWD Bharti 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post