VNMKV Parbhani Bharti 2026 : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी (VNMKV) भरती 2026: आरोग्य केंद्रात विविध पदांसाठी थेट भरती!

VNMKV Parbhani Bharti 2026 : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी (VNMKV) भरती 2026: आरोग्य केंद्रात विविध पदांसाठी थेट भरती!

VNMKV Parbhani Bharti 2026: वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी भरती अर्ज प्रक्रिया सुरू

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी (VNMKV) भरती 2026: आरोग्य केंद्रात विविध पदांसाठी थेट भरती!

नोकरीच्या शोधात असणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ (VNMKV), परभणी यांच्या अंतर्गत मुख्यालयातील आरोग्य केंद्रात कंत्राटी/ठोक मानधन तत्त्वावर रिक्त पदे भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

विद्यापीठातील विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना उत्तम आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी ही पदे भरली जात आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी मुदतीपूर्वी थेट विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. या भरतीची पदे, शैक्षणिक पात्रता, मानधन, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया आणि अर्ज कसा करावा याविषयी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.  VNMKV Parbhani Bharti 2026

भरतीचा थोडक्यात तपशील (Overview)

संस्थेचे नाव वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी (VNMKV)
कामाचे ठिकाण आरोग्य केंद्र, वनामकृवि परभणी मुख्यालय (महाराष्ट्र)

पदांची नावे

  • 1) स्त्री परिचारिका (Nurse) 
  • 2) कुशल आरोग्य मदतनीस

एकूण पदे 02 पदे
नोकरीचा प्रकार 11 महिने कंत्राटी (निव्वळ ठोक मानधन तत्त्वावर)
अर्ज पद्धत ऑफलाइन (प्रत्यक्ष कार्यालयीन वेळेत सादर करणे)
अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2026
अधिकृत संकेतस्थळ www.vnmkv.ac.in
पदांचा सविस्तर तपशील, शैक्षणिक पात्रता व मानधन

1. पदाचे नाव: स्त्री परिचारिका (Staff Nurse)

एकूण जागा: 01 पद
आरक्षण / अट: या पदासाठी फक्त महिला उमेदवारच अर्ज करू शकतील.
शैक्षणिक पात्रता:
   शासनमान्य संस्थेतून ए.एन.एम. (ANM) / जी.एन.एम. (GNM) किंवा बी.एस्सी. नर्सिंग (B.Sc Nursing) कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक.
मासिक ठोक मानधन: रु. 25,000/ (पंचवीस हजार रुपये प्रति महिना). VNMKV Parbhani Bharti 2026

2. पदाचे नाव: एक कुशल (आरोग्य मदतनीस)

एकूण जागा: 01 पद
शैक्षणिक व तांत्रिक पात्रता:
   शासनमान्य विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी (Graduate) उत्तीर्ण असणे आवश्यक.
   शासनमान्य संस्थेतून मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (Marathi Typing 30 wpm) व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. (English Typing 40 wpm) उत्तीर्ण.
   एम.एस.सी.आय.टी. (MSCIT) कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक.
मासिक ठोक मानधन: रु. 15,000/ (पंधरा हजार रुपये प्रति महिना). VNMKV Parbhani Bharti 2026
(टीप: दोन्ही पदांसाठी वर नमूद केलेल्या मानधनाव्यतिरिक्त अन्य कोणतेही भत्ते अनुज्ञेय असणार नाहीत.)

कामाचे स्वरूप, कर्तव्ये व जबाबदाऱ्या

स्त्री परिचारिका (Nurse) यांची कामे:

आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची नोंदणी करणे, तसेच BP (रक्तदाब), Sugar (मधुमेह) तपासणी व ECG काढणे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार रुग्णांना इंजेक्शन देणे व रुग्ण तपासणीमध्ये मदत करणे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सुचविलेले औषधोपचार रुग्णांना देणे.
विद्यापीठ व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या आदेशांचे वेळेवर तंतोतंत पालन करणे. VNMKV Parbhani Bharti 2026

कुशल आरोग्य मदतनीस यांची कामे:

आरोग्य केंद्रातील सर्व प्रकारचा कार्यालयीन पत्रव्यवहार सांभाळणे.
कार्यालयातील पत्रव्यवहार मराठी व इंग्रजीमध्ये टंकलिखित (Type) करणे.
आरोग्य केंद्रातील सर्व कार्यालयीन अभिलेखे (Records) अद्ययावत ठेवणे व इतर कार्यालयीन कामे पार पाडणे.
वैद्यकीय अधिकारी व विद्यापीठ प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे.

निवड प्रक्रिया कशी असेल?

स्त्री परिचारिका: या पदाची निवड शैक्षणिक अर्हता (गुणांकन), अनुभव आणि मुलाखत (तोंडी परीक्षा) यांच्या आधारे केली जाईल.
कुशल आरोग्य मदतनीस: या पदाची निवड प्रामुख्याने शैक्षणिक अर्हता, टंकलेखन कौशल्य आणि अनुभव यांच्या गुणांकनानुसार केली जाईल.

समान गुण झाल्यास नियम:

  • दोन किंवा त्यापेक्षा जास्त उमेदवारांना समान गुण असल्यास ज्या उमेदवाराचे वय जास्त असेल त्यास प्राधान्य देण्यात येईल.
  • वय व गुण दोन्ही समान असल्यास संबंधित क्षेत्रातील जास्त अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.
  • प्राप्त अर्जांची छाननी करून गुणवत्ता यादीनुसार अंतिम निवड केली जाईल.  VNMKV Parbhani Bharti 2026

महत्त्वाच्या अटी व शर्ती

  • कालावधी: सदर नियुक्ती पूर्णपणे 11 महिन्यांच्या कालावधीसाठी निव्वळ मानधन तत्त्वावर असेल. ही नियुक्ती शासकीय कर्मचारी म्हणून गणली जाणार नाही.
  • मुदतवाढ: प्रशासकीय गरजेनुसार व सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने जास्तीत जास्त 02 वेळा मुदवाढ दिली जाऊ शकते; त्यानंतर उमेदवाराला नव्याने निवड प्रक्रियेला सामोरे जावे लागेल.
  • रुजू होणे: नियुक्ती आदेश मिळाल्यापासून 07 दिवसांच्या आत कामावर रुजू होणे बंधनकारक आहे, अन्यथा नियुक्ती रद्द समजून प्रतीक्षा यादीतील उमेदवाराला संधी दिली जाईल.
  • करारनामा: नियुक्तीच्या वेळी उमेदवाराला रु. 500/ च्या बाँड पेपरवर (बंधपत्रावर) विहित नमुन्यात करार करावा लागेल.    VNMKV Parbhani Bharti 2026

आवश्यक हमीपत्रे:

  •  अर्जासोबत लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र (28 मार्च 2005 नंतर 02 पेक्षा जास्त मुले नसल्याबाबत) जोडणे बंधनकारक आहे.
  •    अर्जदारावर कोणत्याही पोलीस ठाण्यात दखलपात्र गुन्हा अथवा आक्षेपार्ह नोंद नसलेबाबतचे हमीपत्र देणे आवश्यक आहे.
  •    अर्जदार शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असणे गरजेचे आहे.  VNMKV Parbhani Bharti 2026

अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडावीत?

उमेदवारांनी मूळ अर्जासोबत खालील प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकित (SelfAttested) प्रती जोडणे आवश्यक आहे:

  • जन्म तारखेचा पुरावा (दहावी बोर्ड सर्टिफिकेट / शाळा सोडल्याचा दाखला TC).
  • रहिवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate).
  • पदवी / नर्सिंग डिप्लोमा / डिग्री उत्तीर्ण गुणपत्रिका व प्रमाणपत्रे.
  • दहावी व बारावीची गुणपत्रिका.
  • MSCIT उत्तीर्ण प्रमाणपत्र.
  • मराठी 30 व इंग्रजी 40 टंकलेखन प्रमाणपत्र (आरोग्य मदतनीस पदासाठी).
  • संबंधित कामाचा अनुभव प्रमाणपत्र (असल्यास).
  • पासपोर्ट आकाराचा स्वतः साक्षांकित केलेला फोटो.
  • लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र व पोलीस केस नसलेबाबतचे हमीपत्र (जाहिरातीमधील नमुन्याप्रमाणे).

अर्ज कसा आणि कुठे करावा?

  • उमेदवारांनी जाहिरातीसोबत दिलेल्या विहित अर्जाचा नमुना डाऊनलोड करून त्याची प्रिंट घ्यावी.
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती (नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल, शैक्षणिक पात्रता गुण इत्यादी) अचूक भरावी.
  • सर्व आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती अर्जासोबत व्यवस्थित जोडून त्यावर पृष्ठ क्रमांक नमूद करावेत.
  • पूर्ण भरलेला अर्ज 30 सप्टेंबर 2026 पर्यंत प्रत्यक्ष कार्यालयीन वेळेत खालील पत्त्यावर सादर करावा:

अर्ज सादर करण्याचा पत्ता:

  • वैद्यकीय अधिकारी, आरोग्य केंद्र,
  • वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ (VNMKV),
  • प्रशासकीय इमारत, वसमत रोड, परभणी 431402.
  • दूरध्वनी क्रमांक: (02452) 229755
  • ईमेल: reg_mau@rediffmail.com

    (महत्त्वाची नोंद: दिनांक 30 सप्टेंबर 2026 नंतर प्राप्त होणारे अर्ज कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.) VNMKV Parbhani Bharti 2026

Krishi Vidyapeeth Anukampa Bharti GR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post